निंभारी येथील पवार बंधूंचा ‘ कार ‘ नामा

सोनई (प्रतिनिधी) : निंभारी (ता. नेवासे) येथील पवार बंधुनी लॉकडाऊनमध्ये घरबसल्या उद्योग म्हणून जुन्या दुचाकी मोटारसायकलपासून चारचाकी मोटार तयार केली आहे. त्यांचा हा कारनामा परीसरात चर्चे चा विषय झाला आहे.निंभारी येथील स्थापत्य अभियंता शिक्षण झालेल्या मात्र सध्या शेती करत असलेल्या जनार्दन पवार यांच्या मॅकेनिकल इंजिनियरचा डिप्लोमा करत असलेल्या युवराज, दहावी शिकत असलेला प्रताप व त्यांचा सातवी शिकलेल्या चैतन्य मकासरे यांनी लॉकडाऊनचा मोकळा वेळ सार्थकी लावत जुन्या दुचाकी मोटारसायकल पासून चारचाकी मोटार तयार केली आहे.
धुळ खात पडलेली दिडशे सीसी पल्सर मोटारसायकलपासून चारचाकी मोटारची निर्मिती करण्यापुर्वी युवराज ने तिची डिझाईन बनविली. गबाळात पडलेले लोंखड व पत्रे घेवून पवार बंधुनी दोन महिन्यात पाच व्यक्तीकरीताची मोटार तयार केली आहे. बाजारातून गेअरबॉक्स आणून ही मोटार मागे घेण्याची सोय केली आहे. तासी ७० किलोमीटर वेग या मोटारीस आहे.
युवराजने यापुर्वी टाकाऊ वस्तूपासून लॉन कटिंग यंत्र, हरबरा पेरणी यंत्र, कपाशी पीकात अंतर मशागतीचे कोळपणी यंत्र तसेच लाकडाच्या विविध खेळणी तयार केलेल्या आहेत. वडील जनार्दन तसेच परीवारातील संजय, हरिभाऊ, पांडुरंग पवार व गोकुळ औटी यांची विशेष साथ लाभली, असे प्रताप पवार यांनी सांगितले.

4 COMMENTS

  1. Wow! This could be one particular of the most useful blogs We have ever arrive across on this subject. Basically Fantastic. I’m also an expert in this topic therefore I can understand your hard work.

  2. Great ?V I should certainly pronounce, impressed with your website. I had no trouble navigating through all the tabs as well as related information ended up being truly simple to do to access. I recently found what I hoped for before you know it in the least. Quite unusual. Is likely to appreciate it for those who add forums or something, site theme . a tones way for your customer to communicate. Nice task..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here