मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या
निवासस्थाना समोर सकल मराठा समाजच्या वतीने आंदोलन,

राष्ट्र सह्याद्री/ प्रतिनिधी


संगमनेर: गांधी जयंतीचे औचित्य साधत राज्यातील महाविकास आघाडीतील मंत्री, आमदार,  खासदार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याची हाक मराठा क्रांती मोर्चाने दिली होती त्या नुसार आज सकल मराठा समाजाच्यावतीने महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथील
निवसस्थाना ठिय्या आंदोलन करण्यात आले. ठिय्या आंदोलन प्रसंगी आंदोलकांनी आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संगमनेर मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेत मोठ्या संख्येने एकत्र येत मंत्री थोरातांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले या आंदोलनात त्यांचे मेहुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे, त्यांची बहीण नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, भाऊ इंद्रजित थोरात,
हे देखील सहभागी झाले होते.

यावेळी अजय फटांगरे, आर. एम. कातोरे, नवनाथ अरगडे, शरद थोरात, अमोल खताळ, खंडू सातपुते, अमोल कवडे, किरण घोटेकर, अशोक सातपुते, राजेंद्र देशमुख, नारायण खुळे, अजित काकडे, राजू सातपुते, रमेश काळे, दिनेश फटांगरे, सुधाकर गुंजाळ, मंजाबापू साळवे, सदाशिव हासे, निर्मलाताई गुंजाळ, सुमित पवार, सुशांत पावसे, सिद्धेश घाडगे, आदी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. 

मराठा क्रांती मोर्चाच्या राज्य समन्वयकांच्या शनिवारी (२६ सप्टेंबर) नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत अनेक महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी ता.२ आॅक्टोबरला खासदार, आमदार यांच्या घरा समोर निर्देशने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

“आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे”, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” “आमच्या मागण्या मान्य करा नाहीत खुर्च्या  खाली करा”… अश्या आक्रमक घोषणा यावेळी देण्यात आल्या.


आरक्षण मिळवून देण्यासाठी महसूलमंत्र्यानी पाठपूरावा करावा….मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हिच बहिणीला ओवाळणी ठरेल अशा भावना यावेळी दुर्गा तांबे यांनी व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here