संगमनेर ची बाधित रुग्ण संख्या 33 व्या शतकाच्या उंबरठ्यावर ….

संगमनेर / विकास वाव्हळ

संगमनेर मध्ये आज कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढली असून ही संख्या आता 33 व्या शतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहचली आहे झपाट्याने होणारी वाढ पहात संगमनेर हे कोरोनाचे केंद्र ठरते की काय अशी भीती वाटू लागली आहे. आज संगमनेर मध्ये नवीन 46 रुग्णांची भर पडली आहे. त्यात शहरातील 13 तर ग्रामीण भागातील 33 जणांचा समावेश आहे तर तालुक्याची एकूण बाधित रुग्ण संख्या ही 3297 वर जाऊन पोहचली आहे.

संगमनेर मध्ये आज शासकीय व खासगी प्रयोग शाळा व  रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारे शहरातील 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यात शहरातील पावबाकी रस्ता येथील 60 वर्षीय व्यक्ती, 54, 20 वर्षीय महिला व अवघ्या4 महिन्याची बालिका, साईनगर 50, 24 वर्षीय महिला, गणेशनगर 43 वर्षीय महिला, 13, 7 वर्षीय बालिका, वीज मंडळ वसाहत 32 वर्षीय तरुण, मालदाडरोड 47 वर्षीय व्यक्ती, देवगाव रस्ता 69 वर्षीय व्यक्ती, घोडेकर मळा 42 वर्षीय व्यक्ती, यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील केळेवाडी 52 वर्षीय व्यक्ती, डोळासणे 55 वर्षीय व्यक्ती, जवळे बाळेश्वर 62 वर्षीय व्यक्ती, 13, 7 वर्षीय बालिका, चिकणी 50 वर्षीय व्यक्ती, सायखिंडी 55, 26 वर्षीय महिला, धांदरफळ बुद्रुक 41 वर्षीय व्यक्ती, धांदरफळ खुर्द 50 वर्षीय व्यक्ती, मंगळापुर 11 वर्षीय बालिका, आश्वी बुद्रुक 52 वर्षीय व्यक्ती,  शेंडेवाडी 65 वर्षीय महिला, वडगाव पान 43 वर्षीय व्यक्ती,13 वर्षीय बालक, गुंजाळवाडी 74, 65, 52 वर्षीय व्यक्ती, 31 वर्षीय तरुण, 37 वर्षीय महिला,

समनापुर 55 वर्षीय व्यक्ती, 25 वर्षीय महिला, मालदाड  52, 35 वर्षीय महिला, रायते 34, 24 वर्षीय तरुण, 35 वर्षीय महिला, मांडवे बुद्रुक 35 वर्षीय तरुण, अकलापुर 61 वर्षीय व्यक्ती, वडगाव लांडगा 50 वर्षीय व्यक्ती, कुरण 46 वर्षीय व्यक्ती, शिबलापुर 67 वर्षीय महिला, यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. आज नवीन 46 
रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधितांची संख्या
3297 वर जाऊन पोहोचली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here