सहा बँकांना केले RBI ने यादीबाहेर

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स  आणि अलाहाबाद बँक यासह सहा सरकारी बँकांना आरबीआय कायद्याच्या दुसऱ्या वेळापत्रकातून वगळले आहे. म्हणजेच आता या बँकांना आरबीआयचे नियम लागू होणार नाहीत. वास्तविक या बँकाचे अन्य बँकांबरोबर विलीनीकरण झाले आहे. म्हणूनच या बँकांची नावे काढून टाकण्यात आली आहेत. या सहा बँकांमध्ये सिंडिकेट बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया, आंध्र बँक, कॉर्पोरेशन बँक आणि अलाहाबाद बँक यांचा समावेश आहे. या निर्णयाचा बँकेच्या ग्राहकांवर परिणाम होणार नाही.

कारण, विलीनीकरणानंतर या बँकांचे ग्राहक, ज्या बँकांमध्ये या बँका विलीन झाल्या आहेत त्या बँकांचे ग्राहक झाले आहेत.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सरकारी बँकांच्या विलिनीकरणीची घोषणा केली होती. या योजनेनुसार युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सचे विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेबरोबर झाले आहे. यानंतर पीएनबी देशातील दुसरी मोठी बँक बनली आहे. सिंडिकेट बँकेचे विलिनीकरण कॅनरा बँकेत झाले आहे, अलाहाबाद बँकेचे विलिनीकरण इंडियन बँकेत तर आंध्र आण कॉर्पोरेशन बँकेचे विलिनीकरण युनियन बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here