दीड हजार फळबाग शेतकऱ्यांना पावणेतीन कोटींचा विमा लाभ!

खासदार डॉ. सुजय विखे यांची माहिती

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नगर:

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून दाखल केलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय स्तरावर मंजूरी मिळाल्याने जिल्ह्य़ातील १ हजार ५४६ फळबाग उत्पादक शेतक-यांना २ कोटी ७२ लाख रूपयांचा लाभ मिळाला असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

हवामानातील बदलांचा मोठा परिणाम फळबागांवर होतो. होणा-या नूकसानीची भरपाई म्हणून केंद्र सरकारने हवामानावर आधारीत पंतप्रधान फळ पीक विमा योजनेची सुरूवात करून फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू केला.जिल्ह्य़ात झालेल्या वादळीवार्यांसह झालेला पाऊस, अतिवृष्टी आणि नैसर्गिक बदलांचा विपरीत परिणाम द्राक्ष आणि डाळींब उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर अर्थिक नूकसान झाले.

हवामावर आधारीत पंतप्रधान फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या नूकसान भरपाई मिळावी म्‍हणून कृषि विभागाने याबातचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. याबाबत प्रशासकीय स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्य़ातील १ हजार ५४६ शेतकऱ्यांना २ कोटी ७२ लाख रूपयांचे अनुदान मंजूर झाले असल्याचे खा.डॉ.विखे पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्य़ातील कर्जत तालुक्यातील ३० शेतकऱ्यांना १४ लाख ४५ हजार नगर तालुक्यातील ७४ शेतकऱ्यांना १० लाख ११ हजार पारनेर मधील २७ शेतकऱ्यांना २लाख ७१ हजार,पाथर्डी मधील १हजार १५ शेतकऱ्यांना ९२ लाख ६८ हजार,राहुरीतील एकमेव शेतकऱ्याला ४२ हजार ८४८ शेवगाव मधील ७८ शेतकऱ्यांना १२लाख ५५हजार श्रीगोंदा तालुक्यातील ३८ शेतकऱ्यांना ४लाख ५१ हजार राहाता तालुक्यातील ११५ शेतकऱ्यांना ३७ लाख ७८ हजार संगमनेर तालुक्यातील ६९ शेतकऱ्यांना ६लाख १४ हजार,कोपरगाव तालुक्यातील ६३ शेतकऱ्यांना १०लाख ५५हजार नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना २५ शेतकऱ्यांना ६लाख २५हजार,श्रीरामपूर तालुक्यातील ११ शेतकऱ्यांना २ लाख ६४ हजार रूपयांचे विमा अनुदान मंजूर झाल्याने अर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून उर्वरित प्रस्तावांचाही पाठपुरावा करून विमा रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खा.डॉ विखे यांनी स्पष्ट केले.

1 COMMENT

Leave a Reply to Voouvj Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here