Positive News: शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला शिफारस करणार…

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे युवा शेतकरी संतोष भागडे यांना आश्वासन

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना निवेदन देताना श्रीरामपूर तालुक्यातील युवा शेतकरी संतोष भागडे, कीर्तनकार दादा महाराज रंजाळे.

साईनाथ बनकर । राष्ट्र सह्याद्री

खैरी निमगाव: – शेतीमाल निर्यातबंदी, आणी शेतीमालाच्या हमीभावाची प्रभावीपणे अमंलबजावणी व्हावी यासाठी केंद्र सरकारला तर अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे झालेले नुकसान, शेतकरी कर्जमाफी, विजेचे  सुलतानी वेळापत्रक, उत्कृष्ट बियाणे आणि रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई, शेतकऱ्यांना मिळणारी वैयक्तिक अपघात विम्याची तुटपुंजी विमा रक्कम, अतिवृष्टी, महापूर, गारपीट यामुळे नुकसान होऊन मिळणारी तुटपुंजी शासकीय मदत, धरणाच्या पाण्याचे शेतीसाठीचे विस्कळीत नियोजन, पीक विम्याची प्रभावीपणे होत नसलेली अंमलबजावणी, दुधाला मिळत नसलेला रास्तभाव, पीक कर्जासाठी बँकेकडून मिळणारी सपत्नीक वागणूक, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा प्रभावी अंमलबजावणीचा अभाव, कोरोना महामारी मुळे फळ बागायतदार शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान याबाबत राज्य सरकारला शिफारस करणार असल्याचे आश्वासन महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निमगांव खैरीचे शेतकरी पुत्र संतोष भागडे यांना दिले.

शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथील तरुण शेतकरी संतोष पाराजी भागडे यांनी भेटीसाठी वेळ मागितली होती. दैनिक ‘राष्ट्र सह्याद्री’ने ही बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेऊन राज्यपाल महोदयांनी त्यांना 3 ऑक्टोबर 2020 सकाळी 11ः30 वाजता भेटीचे निमंत्रण दिले त्यानुसार राजभवनातील राज्यपालांच्या निवासस्थानी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ४० मिनीटांचा वेळ दिला.

सध्या राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या सर्व समस्यावर राज्यपाल महोदयां बरोबर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांचे दुःख भागडे यांनी त्यांच्या कानावर घातले. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या वर कायमस्वरूपी उपाय योजना कराव्यात यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मागणी राज्यपाल भगतसिगं कोश्यारी यांना केली. राज्यपाल हे राज्याचे संविधानात्मक प्रमुख तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामधील दुवा असल्याने निश्चितच बळीराजाचे दुःख समजून घेऊन त्यांच्याकडून शेतकऱ्यांना नक्की न्याय मिळणार आहे, अशी भावना संतोष भागडे यांनी व्यक्त केले. दरम्यान युवा कीर्तनकार दादा महाराज रंजाळे यांच्यासह ते आता गावाकडे रवाना होणार आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here