बेळगाव बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी विधिज्ञ दिनेश पाटील

गिरीश कल्लेद । राष्ट्र सह्याद्री
बेळगाव :
बेळगाव बार असोसिएशनच्या नूतन अध्यक्षपदी विधिज्ञ दिनेश पाटील यांची शनिवारी एकमताने निवड करण्यात आली.

माजी अध्यक्ष ए. जी. मुळवाडमठ यांच्या निधनामुळे अध्यक्षपद रिक्त झाले होते. त्यामुळे बार असोसिएशनच्या सदस्यांच्या वतीने शनिवारी दिनेश पाटील यांची एक मताने निवड करण्यात आली‌ याप्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष सी. टी. मजगी, गजानन पाटील, प्रधान कार्य दर्शी आर. सी. पाटील , सहसचिव शिवपुत्र घटकल यांच्यासह रमेश गुडोदगी सह नितीन गाणगी, प्रभाकर पवार व अन्य सदस्य उपस्थित होते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here