Belgaon: सोमवारी राणी चन्नम्मा विद्यापीठाचा आठवा पदवीदान समारंभ

अमृत बिर्जे। राष्ट्र सह्याद्री

बेळगाव; येथील राणी चन्नम्मा विद्यापीठाचा आठवा पदवीदान समारंभ सोमवार दिनांक 5 रोजी आयोजित करण्यात आला आहे. बेळगाव येथील सुवर्ण विकास सौध येथील सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. या समारंभास कर्नाटक राज्याचे राज्यपाल वजुवाला यांना निमंत्रित करण्यात आले आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत नारायण आणि न्याक या संस्थेचे संचालक प्रा एस सी शर्मा यांची खास उपस्थिती राहणार आहे.

राणी चन्नम्मा विद्यापीठास यंदा दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या विद्यापीठासाठी हिरे बागेवाडी गावाजवळ नवीन इमारत आणि सुसज्जित विद्यापीठ उभारण्यात येणार आहे . यासाठी राज्य सरकार वतीने 127 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यंदा कोरोणा संकटामुळे पदवीदान समारंभ साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहितीही कुलगुरू प्रा रामचंद्र गौडा यांनी यावेळी दिली. केवळ शंभर जणांना उपस्थित राहण्याची मुभा राहणार आहे असेही त्यांनी सांगितले. यावेळी विशेष डॉक्टरेट सन्मान देण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बाबत गोविंदराज यांना तर औद्योगिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी मोहनदास पै तर संस्कृती, कला व धार्मिक क्षेत्रातील कामगिरीसाठी महाराज निरंजन जगद्गुरु राज योगेंद्र महाराज यांना गौरव डॉक्टरेट देऊन यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे . याबरोबरच समारंभात अकरा पदवीधर, 22 स्नातकोत्तर पदवी आणि चार विषयांमध्ये सर्वोत्तम गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या बरोबरच 79 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात येणार आहे. पत्रकार परिषदे वेळी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा बसवराज पद्मशाली आणि वित्तीय अधिकारी प्रा. डी. एन.पाटील उपस्थित होते.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here