Accident: बोलेरो कार आणि टाटा एस वाहनांच्या अपघातात सहा ठार; पंधरा जण गंभीर जखमी…

अमृत बिर्जे। राष्ट्र सह्याद्री

बेळगाव : जिल्ह्यातील सौंदत्ती जवळ झालेल्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले. शुक्रवारी उशिरा रात्री अपघात झाला असून या अपघातात बोलेरो कार आणि टाटा एस या वाहनांची समोरासमोर धडक बसली आहे. सर्वजण सौंदती तालुक्यातील चिंचणूर आणि जकबाळ गावातील रोजंदारी कामगार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या अपघातात पंधरा जण गंभीर जखमी झाले आहेत सदर कामगार रोजच्याप्रमाणे रोजंदारी कामासाठी धारवाड जिल्ह्यातील मोरब येथे गेले होते तर काम संपवून रात्री आपल्या गावी परत येताना हा अपघात घडला आहे . अपघातातील मृता पैकी चौघांची ओळख पटली आहे यामध्ये यल्लाप्पा मूरकीभावी वय 65 , परवा हुरळी वय 35, रुक मवा वडकंणवर वय 35 सर्वजण राहणार चिंचणूर यांच्यासह मारुती पुजारी व बोलेरो चालका चाही या अपघातात मृत्यू झाला आहे. अपघातातील जखमींना धारवाड येथील इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .घटनास्थळी सौंदत्ती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नडवीनमनी यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here