Sports: सलाम… क्रीडा क्षेत्रातील एकाच वर्षात ४ पुरस्कार मिळवणारे लढवय्ये नितीन बलराज..!

Rashtra sahyadri sports

श्रीरामपूर: नाशिक येथील दुधारे फाउंडेशनतर्फे उत्तर महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार, नगरच्या आधार बहुउद्देशीय संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार, नेवासा येथील ज्ञानोदय बहुउद्देशीय संस्था यांचा क्रीडा गौरव पुरस्कार व मनुष्यबळ विकास लोकसेवा अकॅडमीचा १६ डिसेंबर रोजी प्राप्त होणारा राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार हे क्रीडा क्षेत्रातील एकाच वर्षात ४ पुरस्कार मिळवणारे श्रीरामपूरतील एकमेव क्रीडापटू व प्रशिक्षक म्हणजे नितीन बलराज…

बलराज यांनी गुणवान खेळाडू व संघ घडवण्याचा विडाच उचललाय…
स्वतः चांगले खेळाडू असणारे बलराज यांनी श्रीरामपूरमध्ये आपल्या मेहनतीने क्रीडा क्षेत्रात एक उच्च स्थान प्राप्त केलंय. मागील सात वर्षापासून आपल्या खेळाडूंकडून चांगला सराव करून घेत त्यांनी या वर्षी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपले खेळाडू राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार केले. त्यांचं हेच कौशल्य पाहून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी त्यांना श्रीरामपूर तालुका क्रीडा समितीचे सचिवपद बहाल केले. तसेच त्यांच्या व्हॉलिबॉल खेळाडूंनी केलेले उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर महाराष्ट्र व्हॉलिबॉल संघाचे अध्यक्ष पार्थ दोषी यांनी त्यांना महाराष्ट्राच्या १४ वर्षाखालील व १६ वर्षाखालील मुलींच्या संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती दिली.
खेळाडूंना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी त्यांनी खास उत्कृष्ट दर्जाचे व्हॉलिबॉल किडांगण आपल्या शाळेत तयार केले. खेळाडूंना खेळण्यासाठी चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून ते कायम प्रयत्नशील असतात. फक्त व्हॉलिबॉल नव्हे तर त्यांनी बॅडमिंटन, टेबल टेनिस, मैदानी स्पर्धा, खो खो, कबड्डी, क्रिकेट आदी खेळांमध्ये उत्कृष्ट संघ तयार केलेत.

क्रीडा स्पर्धेसाठी व खेळाडूंसाठी कधीही तत्पर असणारे बलराज यांनी घेतलेली झेप थक्क करणारी आहेच. तथापि, ते एवढ्यावरच थांबले नाहीत. कोरोना सारख्या महामारी देखील ते थांबले नाहीत. अनेक ऑनलाईन सेमिनारमध्ये त्यांनी चांगले प्रदर्शन करून अनेक प्रमाणपत्र प्राप्त केले आहेत. श्रीरामपूरच्या या लढवय्या खेळाडू आणि उमद्या प्रशिक्षकाचा सन्मान होणं नक्कीच श्रीरामपूरसाठी अभिमानाची बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here