Pathardi: शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास रस्त्यावर उतरू: आ. राजळे

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

करंजी : पाथर्डी, शेवगाव तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वर्षीचा खरीप हंगामच शेतकऱ्यांचा वाया गेला असून सरकारने या सर्व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई दिली नाही तर शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, असा सूचक इशारा आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिला आहे.

पाथर्डी तालुक्यातील शंकरवाडी येथील पाझर तलाव तब्बल १९ वर्षांनी पाण्याने तुडुंब भरला असून या पाण्याचे जलपूजन आमदार राजळे यांच्यासह माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. ‘यावर्षी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला असून नुकसानग्रस्त सर्व पिकाचे पंचनामे करून त्यांना सरकारने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आपण केली असुन कोरोनाच्या नावाखाली सरकार वेळ मारून नेत आहे की काय? असा प्रश्न आता निर्माण होवू लागला आहे’, असे आ. राजळे म्हणाल्या.

माजी आमदार कर्डिले म्हणाले, मागील सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली म्हणूनच यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे बंधारे पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून शेतकऱ्यांचे सिंचन क्षेत्र यामुळे मोठ्या प्रमाणात ओलिताखाली येणार आहे. केंद्र व राज्य सरकारने संयुक्तपणे सहा महिने लॉकडाउन केल्यामुळे खऱ्या अर्थाने वातावरणात बदल झाला व प्रदूषण पूर्णपणे थांबले व यावर्षी वरूणराजा मनसोक्तपणे बरसला. त्यामुळे वर्षातून किमान तीन महिने लॉकडाऊन केले तर हवामानाचा समतोल व वातावरणही आरोग्यदायी राहील व सर्वत्र भरपूर पाऊस होऊन कुठे पाणीटंचाईचा प्रश्नच निर्माण होणार नाही. अशा पद्धतीची मागणी आता सरकारकडे करावी लागणार असल्याचे म्हणत मागील सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या दुधाला पाच रुपये प्रमाणे हमीभाव देण्यात आला मात्र सध्याची दुधाची परिस्थिती अतिशय बिकट झाली असून दुधाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याचा दुग्ध व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असल्याचे कर्डिले म्हणाले.

यावेळी वांढेकर महाराज, पं. स. सदस्य एकनाथ आटकर, सरपंच अशोक दहातोंडे, प्रमोद गाडेकर, माजी सरपंच साहेबराव गवळी, अण्णासाहेब शिंदे, अन्सारभाई शेख, नवनाथ निंबाळकर, सुखदेव शिंदे, ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच गणेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी खरपुडे, भानुदास नवघरे, विजय नवघरे, भाऊसाहेब जाधव, दादासाहेब दांडेकर, गुलाब जाधव, दामोदर जाधव, कानिफनाथ जाधव, भाऊसाहेब मिरपगार, कारभारी रावडे, विजय जाधव यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

6 COMMENTS

  1. I liked up to you’ll obtain performed proper here. The sketch is attractive, your authored subject matter stylish. however, you command get bought an shakiness over that you wish be turning in the following. unwell no doubt come more earlier once more since precisely the similar nearly very steadily within case you shield this increase.

  2. When I originally commented I clicked the -Notify me when new comments are added- checkbox and now each time a comment is added I get four emails with the same comment. Is there any way you can remove me from that service? Thanks!

  3. I’m really enjoying the theme/design of your web site. Do you ever run into any web browser compatibility issues? A couple of my blog visitors have complained about my site not operating correctly in Explorer but looks great in Opera. Do you have any advice to help fix this issue?

  4. What i do not realize is in truth how you are now not really a lot more neatly-liked than you may be right now. You are so intelligent. You understand thus significantly with regards to this matter, produced me individually imagine it from a lot of numerous angles. Its like women and men don’t seem to be interested unless it is one thing to accomplish with Lady gaga! Your personal stuffs outstanding. Always handle it up!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here