Ahmednagar: रखडलेल्या रस्त्याला खा. विखे यांचे नाव; मनसेचे अनोखे आंदोलन 

खा. विखे यांनी रस्त्याच्या कामात घातला खोडा

नगर : भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीला खोडा घातला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काटवन खंडोबा रोडला खासदार डॉ. सुजय विखे पाटील मार्ग, असे नामकरण केले आहे. शहरातील आयुर्वेदिक कॉलेज चौकातून काटवन खंडोबाकडे रोडवर मनसे पदाधिकाऱ्यांनी आज हे आंदोलन केले. मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व सचिव नितीन भुतारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
काटवन खंडोबाकडे जाणारा रोड अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. रस्त्यावर मोठाले खड्डे पडलेत. महापालिकेने या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला होता. तो मंजूर देखील झाला होता. त्यासाठी १५ लाख रुपये आले होते. परंतु भारतीय जनता पक्षाच्या काही नगरसेवकांनी खासदार निधीतून हा रोड होईल, असे सांगितले. त्यानुसार आयुक्तांनी प्रस्ताव केला आणि रस्त्या खासदार निधीकडे वळवला. त्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले. परंतु दोन वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा मुद्दा उचलून धरला आणि आज संबंधित रस्त्याला खासदार सुजय विखे पाटील यांचे नाव दिले. पुढील आठ दिवसांमध्ये रस्त्यांच्या दुरुस्तीवर कार्य वाही न झाल्यास मनसे स्टाईलने खा. विखे आणि आयुक्त यांच्याविरुद्ध आंदोलन केले जाईल, असा इशारा सचिन डफळ यांनी दिला. इंजि. विनोद काकडे, अनिता दिघे आ द पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here