Karnataka: प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना समन्स

उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमवल्याचा आरोप

बेळगाव । प्रतिनिधी

कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माजी मंत्री डी के शिवकुमार यांना सीबीआयने समन्स पाठवले असून दोन दिवसात चौकशीसाठी हजर रहावे असे कळविण्यात आले आहे.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळपासूनच डी. के. शिवकुमार यांच्या कनकपूर येथील घरासह त्यांच्या 14 मालमत्तांवर एकाच वेळी धाड टाकली होती. उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमवण्याचा आरोप डिकें शी यांच्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. ाबाबत त्यांनी डिकेशी विरोधात एफआयआर दाखल केले असून दोन दिवसात चौकशीसाठी हजर रहावे असे समनस मंगळवारी बजावले आहे. दरम्यान सीबीआय’च्या अधिकार्‍यानी डि केशींच्या वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या 14 मालमत्तांवर एकाच वेळी धाड टाकून 57 लाख रुपये रोख तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. आता त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहे त्यामुळे हे प्रकरण पुढे कोणते वळण घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here