काँग्रेसची वर्तणूक कमिशन एजंट प्रमाणे -केंद्रीयमंत्री जोशी

बेळगाव-प्रतिनिधी
केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेस विरुद्ध कठोर शब्दात टीका प्रहार केला आहे. काँग्रेसची आधीपासूनच कमिशन एजंट प्रमाणे वर्तणूक राहिली असून देशावर साठ वर्षे राज्य केलेल्या काँग्रेसने शेतकऱ्यांच्या विरोधच काम केले आहे अशी टीकाही केंद्रीय मंत्री जोशी  यांनी केली.
   मंगळवारी बेळगावात आले असता आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी बोलत होते.  काँग्रेसने सर्व कामांसाठी दलाली देण्याचे काम केले आहे असा आरोपही जोशी यांनी केला.  प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के शिवकुमार यांच्यावरील सीबीआय धाडी प्रकरणी पत्रकारांनी  त्यांना छेडले असता,  सीबीआय धाडी आणि केंद्र सरकारचा कोणताही संबंध नसल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले. सीबीआय आपले काम करत असून डिकेशी यांनी आपल्या आमदार होण्यापूर्वीची मालमत्ता आणि सध्याची मालमत्ता जाहीर करावी असे आवाहनही केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी दिले.
याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि परिवहन खात्याचे मंत्री लक्ष्मण सवदी,  विधान परिषदेचे मुख्य सचेतक महांतेश कवटगीमठ,  राज्यसभा सदस्य कडाडी यांच्यासह अन्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here