डॉक्टर साहेब अजून किती पाहणारा अंत

श्रीगोंद्यात कोरोनाच्या नावाखाली लूट केल्याचे उघड: डॉक्टर पैशे देण्यास तयार

श्रीगोंदा : या कोरोनाच्या गंभीर प्रसंगातही कित्येक ठिकाणी डॉक्टरांनी फसवल्याचे प्रकार घडले आहेत असाच एक प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडल्याची बाब समोर आली आहे. तालुक्यातील एका ग्रामीण भागातील एका गावातील साधारण १५ वर्षाच्या मुलाला वातावरणातील बदलामुळे सौम्य प्रकारचा ताप आला त्यावर त्याच्या आई वडिलांनी त्यास खाजगी दवाखान्यात नेले असता ताप येत असल्यामुळे त्या ठिकाणच्या संबंधित डॉक्टरांनी त्याची कोरोना टेस्ट करण्याचा सल्ला दिला. त्यावर त्या मुलाच्या नातेवाईकांनी त्या मुलाची कोरोना टेस्ट केली त्यावेळी त्यांना तात्काळ ५० हजार रु रुग्णालयात जमा करण्यास सांगितले. रुग्णाच्या आई वडिलांची गाडाभर गरिबी त्यांनी उसनेपासने करून ५० हजार रु रुग्नालयात जमा केले.

त्यानंतर काही काळातच त्या मुलाचा ताप कमी झाला. मात्र कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याला रुग्णालयातच ठेवावे लागेल आणि अजून चार लाख जमा करा असे संबंधित डॉक्टर यांच्याकडून सांगण्यात आले मात्र मध्यंतरीच्या कालावधीत राहुरी या ठिकाणी राहत असलेला रुग्णाचा मेव्हणा त्या ठिकाणी आला तोही हॉस्पिटल मध्ये कामाला आहे. त्यावेळी रुग्णाला कोणताही त्रास होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तो आजारी रुग्ण श्रीगोंद्यातील खाजगी रुग्णालयातून अहमदनगर या ठिकाणी नेवून त्याची पुन्हा कोरोना टेस्ट केली. त्यावेळी त्या रुग्णाची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली संबंधित रुग्णाचे रिपोट घेऊन रुग्ण आणि त्याचे मेव्हण्याने श्रीगोंद्यातील कोरोना टेस्ट केलेले रुग्णालय गाठले.

यांनी याबाबत डॉक्टर याना विचारपूस केली असता. श्रीगोंद्यातील तो खाजगी डॉक्टर उत्तर देऊ शकला नाही. त्यावेळी रुग्णाच्या मेव्हण्याने आमचे भरलेले ५० हजार रुपये , द्या अन्यथा आम्ही तुमच्या विरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करणार आहे, असे म्हणताच डॉक्टर ने आपली भूमिका नरमाईने घेतली. भरलेले ५० हजार रु परत देण्याचे कबूल केले आहे. त्यानुसर डॉक्टर येत्या दोन दिवसात ५० हजार रुपये रुग्णाच्या नातेवाईकास परत देणार आहे. मात्र सदर घटना हि वाऱ्यासारखी परिसरात पसरली आहे. त्यामुळे कोरोनाच्या नावाखाली रुग्नाची श्रीगोंद्यात मोठ्या प्रमाणात लूट सुरु आहे हे सिद्ध झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here