नागवडे सहकारी साखर कारखाना सभासदांना व कामगारांना आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळावा – दत्तात्रय पानसरे

प्रतिनिधी
श्रीगोंदा : तालुक्यातील सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना सभासदांना व कामगारांना covid-19 च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विमा पॉलिसी योजनेचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक रमाकांत नाईक साहेब यांना निवेदन दिले.
श्रीगोंदा तालुक्यातील सर्व सामान्य जनता कोविड १९ या आजाराने मोठ्या प्रमाणात भयभीत झाली आहे.
तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे त्यात रुग्णाची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होताना दिसत आहे. याचा पार्श्वभूमीवर सहकारमहर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना सभासदांना व कामगारांना विम्याचे कवच द्यावे.
त्यांच्या कुटुंबास आरोग्य विम्याचे कवच सभासद व सभासदांच्या कुटुंबातील व्यक्तींना दोन लाख रुपये याची विमा पॉलिसीचा लाभ देण्यात यावा यासाठी वयाची आठ नसावी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे जर केवळ वैद्यकीय उपचारासाठी जाणार असतील तर कुटुंबाची प्रगती होणार नाही म्हणून कारखान्याने विम्याचा आधार देऊन सभासदांचे प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालक रमाकांत नाईक साहेब यांना निवेदनातं केली आहे..

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here