साईकृपा पॉलीटेकनिकचे प्राचार्य प्रा. दिनेश सुरेश भदाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आशियाई शिक्षण पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी
श्रीगोंदा: आशिया खंडातील ४८ देशातून शिक्षण क्षेत्रात अभिनय प्रयोग करून तांत्रिक अभ्यासाचा ग्रामीण भागात कौशल्यपूर्ण पद्धतीने प्रचार व प्रसार करण्याच्या कामासाठी साईकृपा पॉलीटेकनिकचे प्राचार्य प्रा. दिनेश सुरेश भदाणे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ASIAN EDUCATION AWARD-2020 बेस्ट अँड मोस्ट प्रॉमिसिंग यंग प्रिंसिपल ऑफ द इयर ने सन्मानित करण्यात आले.
सदर पुरस्कार त्यांना ५ सप्टेंबर २०२० रोजी मोठ्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला. “काइट्स प्रॉडक्शन” ही भारतातील संस्था आशिया खंडातील ४८ देशातील शिक्षण क्षेत्रावर लक्ष ठेवून निवडक शिक्षकांना नामांकनासाठी निवडते. त्यानंतर त्यांच्या ऑनलाईन मुलाखती, व्हर्चूल सादरीकरण, ग्रुप डिस्कशन आणि तत्सम क्षेत्रातील कार्यप्रणाली अशा विविध टप्प्यातुन पुरस्कार्थींची निवड करण्यात येते.
आजपर्यंत तंत्रज्ञानाच्या मदतीने मुख्यतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण सहज सोप्या पद्धतीने विविध उपक्रम व अभिनव प्रयोगाद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी प्रा. दिनेश सुरेश भदाणे ह्यांना यापूर्वीही अनेक आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सदर पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल श्री. दत्तकृपा शैक्षणिक व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित साईकृपा तंत्रनिकेतन चे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, सचिव अर्चना पानसरे व इतर पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here