Crime: गुटखा प्रकरणातील पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात ; एकलहरेचा अस्सल गुटखा किंग अजूनही मोकाट !

पोलिसांकडून एका पंटरवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर : तालुक्यातील एकलहरे शिवारातील आठवाडी परिसरातील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी राहुल मदने व पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी टाकलेल्या छापा आता संशयाच्या भोवर्‍यात अडकला असून, या गुटखा छाप्यातील गुलाबाच्या बागेच्या मालकाला पोलीस प्रशासन वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

पोलिसांनी या गुटखा छाप्यातील ठिकाणच्या जागेशी गुन्ह्यातील आरोपीचा काहीही संबंध नसलेल्या एका पंटरवर गुन्हा दाखल केला असून, ज्या ठिकाणी हा अवैध व्यवसाय चालू होता त्या पत्र्याचे शेड व जागा मालक याची संपूर्ण सखोल चौकशी करून संबंधित गुटखा किंगवर गुन्हा दाखल करणे आवश्यक होते, मात्र पोलिसांनी केवळ पंटरवर गुन्हा दाखल केला आहे, त्याचा एकलहरे कार्यक्षेत्रात स्वतःच्या मालकीची जागा नाही त्याला गावांत कोणीही ओळखत नाही, पोलिसांनी ज्या ठिकाणी छापा टाकला होता त्या ठिकाणच्या जागेचे उतारे तपासून मूळ मालकाचा शोध घेणे गरजेचे होते, त्यानुसार कारवाई आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील आतापर्यंतची गुटखा प्रकरणाची पोलिसांनी केलीली इतक्या मोठ्या कारवाईत पोलिसांनी गुलाबाच्या बागेला जाणूनबुजून दुर्लक्ष केले का ? एकलहरेच्या अस्सल गुटखा किंगला पोलिस जाणूनबुजून दुर्लक्ष करीत तर नाही ना ? अशा चर्चेला जिल्ह्यात उधाण आले आहे.
पोलिसांनी या छाप्यात येथील शेतांतील गुलाबाच्या बागे लगद असलेल्या एका पत्र्याच्या शेड मधून ट्रक, आयशर व एक टेम्पोभर मानवी जिवीतास हानीकारक असलेला व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला 37,12,000/- रुपयांचा हिरा नावाचा पानमसाला व त्यामध्ये मिसळविण्यासाठी वापरण्याची रॉयल 717 नावाची 9,42,000/- रुपयांची सुगंधी तंबाखु व त्याची अवैधरित्या वाहतुक करण्यासाठी आवश्यक असलेली वाहने असा एकुण 53,54,000/- रुपयांचे मुद्देमाल जप्त केला होता.
या छाप्प्याबाबत परिसरात वेगवेगळी चर्चा चालु असुन दोन गुटखा व्यापार्याच्या व्यवसायीक स्पर्धेतुन ही टिप देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे गुटखा पकडण्यात आला होता. तेव्हाच्या कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असताना आता पुन्हा दुसरी कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here