आता शाळा सुरू होणार दिवाळीनंतरच

मुंबई : केंद्र सरकारने 15 ऑक्टोबर नंतर शाळा सुरू करण्याची तयारी दाखवली होती मात्र राज्यांमध्ये परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे हा निर्णय प्रत्येक राज्याने लागू करण्याचे टाळले होते.
केंद्र सरकारने शाळा सुरू करण्याची भूमिका घेतलेली असली तरी राज्यात मात्र दिवाळीनंतर या बाबत परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा, असा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी निर्णय घेण्यात आला.

केंद्राने निर्णय घेतला असला तरी राज्यात १५ ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यासारखी परिस्थिती नाही. काही राज्यांनी आधी शाळा सुरू केल्या पण कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्याने त्या पुन्हा बंद कराव्या लागल्या . अशी भूमिका मुलांच्या दृष्टिकोनातून योग्य ठरणार नाही.
कोरोनाच्या भयावह परिस्थितीत सर्व शाळा ऑनलाइन पद्धतीने शिक्षणाची व्यवस्था वाढविण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत स्पष्ट केले. कोरोनासंदर्भातील सद्यस्थितीबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात आले. यावरून सद्य परिस्थिती पाहता शाळा त्यानंतर सुरू करण्यात याव्यात हा निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here