राज्य मंत्रिमंडळात विविध निर्णयांवर शिक्कामोर्तब

मुंबई –

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासह इतर काही महत्त्वाचे निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत. या मध्ये हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी ईझ ऑफ डुइंग बिझिनेसची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

कृषिपंप शेतकऱ्यांना मोठा दिलासा. उच्चदाब वितरण प्रणाली योजना राबविण्यासाठी एशिएन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेण्याचा निर्णय.

– ग्रामीण भागातील लाखो कुटुंबियांना दारिद्र्य रेषेवर आणणाऱ्या नव तेजस्विनी-महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पाला गती देणार. तसेच 523 कोटी रुपये निधी उभारणार. आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधीमार्फत सहाय्य

– महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे कुलगुरु व प्रकुलगुरु या वैधानिक पदावर नियुक्त अधिका-यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धर्तीवर ७ व्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करण्याचा निर्णय.

– हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी परवान्यांची संख्या कमी करून ईझ ऑफ डुइंग बिझिनेसची प्रभावी अंमलबजावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here