दौंडला बेकायदा वाळु उपसा करणारया ११ बोटी उध्वस्त,

महसूल विभागाची कारवाई,
राजेंद्र झेंडे, राष्ट्र सहयाद्री   
पाटस ः  दौड च्या पुर्व भागातील देऊळगाव राजे, खोरवडी, धुमाळ फाटा येथील भीमा नदीच्या पात्रात खुलेआम सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपसा करणारा ११ बोटी  जेलीटने उडवून उध्वस्त केल्या आहेत, अशी माहिती निवासी नायब तहसीलदार सचिन आखाडे यांनी दिली.
 मागील महिन्यात महसुल विभागाच्या पथकाने शिरापुर येथील भिमा नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या १३ बोटी उध्वस्त करून कारवाई केली होती, तरीही दौंड च्या पुर्वे भागातील देऊळगाव राजे, मलठण, वाटलुज, राजेगाव , नायगाव आदी भागातील स्थानिक वाळू माफियांनी राजकीय वरदहस्त असल्याने वाळू उपसा सुरूच ठेवला आहे, मात्र राजकीय दबावाला न जुमानता तहसीलदार संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल च्या पथकाने आज बुधवारी (  दि ७) खोरवडी, धुमाळ फाटा, देऊळगाव राजे येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या ७ फायबर व ४ सेक्शन असे एकूण ११  यांत्रिक फायबर बोटी जेलिटेन च्या सहाय्याने उडवून नष्ट करून मोठी कारावाई केली आहे. नायब तहसीलदार सचिन आखाडे, मंडलधिकारी अजित मोहिते,सुनील जाधव,विजय खरतोडे तसेच देऊळगाव राजे,दौंड,वरवंड येथील  तलाठी यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे, दरम्यान महसूल विभागाने केलेल्या या कारवाई चे शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here