राहाता शहरात मोकाट कुत्र्याचा सुळसुळाट

राहाता : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने शहराच्या विविध भागात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.

नगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची शहरातील नागरिक मागणी करत आहे.
राहाता शहरातील नागरिकांनी घराच्या जवळपास  रंग-बिरंगी रंगाच्या पाण्याच्या बॉटल ठेवताना दिसत आहे. नागरिकांच्या मनात अशी भावना आहे की, घराच्या अंगणात रंग बिरंगी पाण्याच्या बाटल्या ठेवल्याने कुत्रे आपल्या अंगणात येत नाही, अशी नागरिकांची भावना झाली आहे. यामुळे शहरात घराच्या अंगणात बाटल्या ठेवल्याचे दिसत आहे.

तर शहरातील नागरिक मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकांवर कुत्रे
भुंकू लागल्याने वाहन चालकांचे नियंत्रण बिघडल्याने अपघातास निमंत्रण ठरत आहे. मोकाट कुत्र्यांमुळे पादचाऱ्यांमध्ये एक घबराट निर्माण झाली असून,कुत्र्यांची भिती वाटत असल्याने अनेकांनी आपले मार्ग बदलून दुसऱ्या मार्गाने जात आहे. राहाता शहरातील नागरिका  कडून व प्राणी जीवन संस्थेकडून कुत्र्यांची शस्त्रक्रिया करण्याची मागणी केली जात आहे.

यासाठी राहता नगरपालिकेने पुढाकार घेणे गरजेचे आहे. मात्र मोकाट कुत्र्यांची टोळी गल्ली गल्लीत, महामार्गावर, चौकात,बाजारपेठेत आदी ठिकाणी फिरून धुडगुस घालत आहे. शहरातील आशा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातील नागरिक करत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here