कर्जत शहर स्वच्छतेसाठी कर्जत तालुका पत्रकार संघाची भन्नाट कल्पना, टाकाऊ मोकळा तेलाचा डबा बनणार टिकाऊ आधुनिक डस्टबीन

प्रतिनिधी | राष्ट्रसह्याद्री दि ८

कर्जत : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत “स्वच्छ कर्जत- सुंदर कर्जत” या अभियान अंतर्गत कर्जत तालुका पत्रकार संघ व कर्जत नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत शहरातील प्रत्येक दुकानासाठी रिकाम्या तेलाचा डब्याचा वापर डस्टबीन करण्याची मोहीम हाती घेतली आहे. टाकाऊपासून टिकाऊ या अभियानास कर्जतकरानी सकारात्मक प्रतिसाद दिला. बुुधवारी कर्जत तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी शहरात फेरफटका मारीत टाकाऊ तेलाचे डबे गोळा केले.
           स्वच्छ सर्वेक्षण २०२१ या अभियानात कर्जत नगरपंचायत सहभागी झाली आहे. शहरातील प्रत्येक प्रभाग कर्जत नगरपंचायत आणि सामाजिक संघटना हे संयुक्तरित्या एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवित आहे. कर्जत शहर स्वच्छ आणि कचरामुक्त करण्याचा संकल्प सर्वानी हाती घेतला असून त्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुका पत्रकार संघ आणि कर्जत नगरपंचायत यांनी संयुक्तपणे कर्जत शहरातील प्रत्येक दुकानात एक डस्टबीन असावे जेणेकरून दुकानातील कचरा रस्त्यावर न टाकता तो ग्राहक आणि नागरिकांनी त्याच डस्टबीनमध्ये टाकावा. यामुळे अप्रत्यक्षरित्या कचरामुक्त कर्जत शहर संकल्पनास चालना मिळणार आहे. याच अनुषंगाने प्रत्येकाच्या घरात अथवा किराणा दुकानात असणारे टाकाऊ रिकामे तेलाचा डबा तो टिकाऊ करीत त्यास वेगळ्या स्वरूपात डस्टबीन तयार करीत वापरात आणण्याची संकल्पना पत्रकार संघाच्या पदाधिकारी यांनी अंमलात आणली आहे. सदरची संकल्पना सोशल मीडियावर प्रसिद्ध करताच त्यास कर्जतकरानी आणि व्यापारी बंधूनी सकारात्मक प्रतिसाद देत स्थानिक पत्रकाराशी संपर्क साधत तेलाचे डबे देण्याची तयारी दर्शविली. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी कर्जत तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष मुन्ना पठाण, जिल्हा उपाध्यक्ष गणेश जेवरे, उपाध्यक्ष मोतीराम शिंदे, सचिव मच्छिंद्र अनारसे, सल्लागार सुभाष माळवे, आशिष बोरा,  खजिनदार डॉ अफरोजखान पठाण आणि प्रेस फोटोग्राफर आण्णा बागल, नामदेव फरांडे आणि कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी संपर्क केलेल्या व्यापारी बंधू आणि स्थानिक नागरिकाच्या जवळ असणारे तेलाचे मोकळे डबे जमा करण्याची मोहीम हाती घेतली.
चौकट – रिकाम्या तेलाचा डबा उत्तम डस्टबीन बनविण्याचा संकल्प
          घरात अथवा अनेक किराणा दुकानात मोकळे तेलाचे डबे पहावयास मिळते. जे टाकाऊ म्हणून गणले जाते. त्यास आधुनिक आकार देत त्याचा वापर डस्टबीन करण्याची संकल्पना कर्जत तालुका पत्रकार संघाच्या सदस्यांनी व्यक्त केली होती. याबाबतची माहिती सर्व पदाधिकारी यांनी सोशल मीडियावर प्रसारीत केल्याने त्यास कर्जतच्या व्यापारी बंधू आणि नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. लवकरच सर्वांच्या सहकार्याने स्वच्छ कर्जत – सुंदर कर्जतसाठी हा डस्टबीन चांगला पर्याय ठरणार आहे.
                                         – मुन्ना पठाण,
                   अध्यक्ष – कर्जत तालुका पत्रकार संघ
2) कर्जत तालुका पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम – मुख्याधिकारी गोविंद जाधव
            कर्जत शहराने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी मोठी तयारी केली आहे. दररोज शहरातील प्रत्येक प्रभागात नियोजन करीत सर्व सामाजिक संघटना यांच्याबरोबर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. कर्जत तालुका पत्रकार संघाने याच अनुषंगाने मोकळ्या तेलाचा डब्याचा वापर आधुनिक टिकाऊ डस्टबीन करण्याची संकल्पना अंमलात आणली आहे. त्यांचा हा उपक्रम निश्चित स्वच्छ कर्जत शहरासाठी मोठा हातभार देणारा ठरणार आहे. नागिरकांनी या आवाहनास अजून मोठ्या संख्येने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास ते सर्वासाठी रोल मॉडेल ठरेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here