Corona: पोलीस अधीक्षक पाटील यांना कोरोना!

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नगर : जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना कोरोना संसर्गाचे निदान झाले आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.
मनोज पाटील यांनी जिल्हा पोलीस दल प्रमुखपदाचा पदभार १ ऑक्टोबरला स्वीकारला. पाटील हे सोलापूर येथून बदली होऊन अहमदनगर जिल्ह्यात आले आहेत. पाटील यांच्या स्वागतासाठी अनेकांनी त्यांच्या भेटी घेतल्या. जिल्ह्याची परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. पत्रकार परिषद घेतली. राजकीय नेते आणि पदाधिकारी यांनी देखील पाटील यांची भेट घेऊन स्वागत केले.
याच दरम्यान काल पाटील यांना अशक्तपणा आणि त्रास जाणवू लागला. पाटील यांनी यावर कोरोना चाचणी करून घेतली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घेऊन स्वतः देखील तपासणी करून घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here