Sugar: शेतकऱ्याचे साखर कारखान्याविरुद्ध अनोखे आंदोलन

साखर कारखान्याला दिला शाप… संचालक मंडळ विरुद्ध नाराजी..!

बेळगाव / प्रतिनिधी

घाम गाळून पिकवलेला ऊस साखर कारखान्यास देऊन तीन वर्षे झाली तरी अद्याप बिले न दिल्याच्या कारणामुळे एका शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने या साखर कारखाना विरुद्ध आंदोलन केले आहे. समाधीसाठी खड्डा करून त्याच ठिकाणी बसून या शेतकऱ्याने साखर कारखाना विरुद्ध आपला रोष प्रकट केला आहे. बेळगाव जिल्ह्यातील कितूर तालुक्यातील शिवानंद गोहार यांनी केलेल्या या अनोख्या आंदोलनामुळे शुक्रवारी जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू होती.

जिल्ह्यातील एम. के. हुबळी येथील मलाप्रभा साखर कारखान्यास शिवानंद या शेतकऱ्याने सुमारे 114 टन ऊस पाठवला होता आणि साखर कारखान्याकडून त्याला 85 हजार रुपये येणे बाकी आहेत. यासाठी या शेतकऱ्याने साखर कारखान्याकडे अनेक वेळा जाऊन बिल मागणी केली होती. मात्र सुमारे तीन वर्षापासून त्याला बिल देण्याचे टाळण्यात येत आहे. यामुळे संतप्त झालेल्या या शेतकऱ्याने मृत्युपूर्वी आपली समाधी घेण्यासाठी खोदाई केली आहे आणि याच ठिकाणी बसून या साखर कारखान्याच्या विरोधात आवाज उठविला. साखर कारखान्याला त्याने शापही दिला असून संचालक मंडळ विरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे.

अशीच परिस्थिती राज्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे. साखर कारखान्यांना ऊस पाठवला तरी अनेक कारखान्यांनी वेळेवर शेतकऱ्यांची बिले न दिल्याने ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here