श्रीरामपूरात मराठा समाजाचे धरणे आंदोलन

श्रीरामपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर श्रीरामपूर तालुक्यातील सकल मराठा समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. प्रशासकीय भवन येथे मराठा समाजाने नुकतेच धरणे आंदोलन केले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाज राज्यभरात आक्रमक झाला आहे. ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये लाखो, करोडोंच्या संख्येने शांततेत ५८ मूक मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाची नोंद यापूर्वी झालेली आहे.
आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने केंद्र व राज्य सरकारला जागे करण्यासाठी पुन्हा एकदा मराठा समाजाने आंदोलनांची सुरवात केली आहे. श्रीरामपूरात मराठा समाजाने प्रशासकीय भवन येथे धरणे आंदोलन केले. यावेळी अनेक समाज बांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने लाखो विद्यार्थी, युवकांचे शैक्षणिक व नोकरीचे नुकसान होत आहे.
मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत शासकीय पातळीवर कोणतीही नोकर भरती अथवा परीक्षा होऊ नये. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी राज्य व केंद्र सरकारने जागे होऊन निर्णय घ्यावा अशी, मागणी सकल मराठा समाज श्रीरामपूरच्या वतीने करण्यात आली. यावेळी श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील यांना मराठा समाज   बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here