गिरीम येथील ‘दोन’ महिलेची जटेतून मुक्तता :, अंनिसाचा पुढाकार

राजेंद्र झेंडे, राष्ट्र सह्याद्री
 पाटस : दौंड तालुक्यातील गिरीम येथील दोन महिलेच्या डोक्यात केसाचा वाढलेला जट कापून त्या महिलेला जटेतून मुक्त करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती च्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदिनी जाधव यांनी तिचे केस कापून तिला या अंधश्रध्देतून मुक्त केले. विशेष म्हणजे त्या महिलेल्या पतीनेच यासाठी पुढाकार घेतला. अंधश्रध्दा निर्मुलन समितीने आता पर्यंत 174 महिल्याच्या डोक्यातील जट मोफत कापले आहेत. गिरीमीच्या दोन महिला या 173 व 174 या जटेतून मुक्त झाल्या आहेत. अशी माहिती नंदिनी जाधव यांनी दिली.
         ग्रामिण भागात समाजात विविध प्रकारची अंधश्रध्दा आहे. अंधश्रध्देचे भुत एकदा माणसाला लागले की ती निघता निघत नाही. मग ते शिकलेला असो किंवा अज्ञान अंधश्रध्दा तिला पछाटतेच. पिढ्यानपिढया चालत आलेली रूढी,परपंरा,चालीरिती या विरोधात काम करणे म्हणजे वाटते तेवढे सोपे नाही.
मात्र मागील अनेक वर्ष महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती या व्यवस्थेविराधात मैदानात उतरून या अंधश्रध्देला मुठमाती देण्याचे काम करीत आहेत. समाजात विशेषता महिलामध्ये केसात वाढलेली जटा बद्दल प्रचंड मोठी धार्मिक अंधश्रध्दा आहे.
  यातून त्या महिलेला बाहेर काढणे फार अवघड काम मात्र महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदीनी जाधव आणि आता पर्यंत तब्बल 174 महिलांना या अंधश्रध्देच्या जटेतून मुक्त केले आहे.
दौंड तालुक्यातील गिरीम येथील धनश्री कांबळे या महिलेल्या डोक्यात पाच वर्षापासून केसाचा जटा वाढलेला होती. तर विद्या टकले या महिलांच्या डोक्यात केसातील जटा वाढलेली होती. धनश्री कांबळे हीच्या पतीने नंदीनी जाधव यांच्या संपर्क करून आपल्या पत्नीच्या केसातील जटा काढण्याची विनंती मोबाईल वरून केल्याने आज शुक्रवारी (दि. 9 ) अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्षा नंदीनी जाधव व महाराष्ट अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी गिरीम येथे जावून धनश्री कांबळे या महिलेच्या केसा जटा कापून तिला त्यातून मुक्त केले.तर तेथील एका शिक्षकेच्या पत्नी विद्या टकले, या महिलेला ही शेतात जावून तिच्या केसातील जटा कापून तिला या अंधश्रध्देतून मुक्त केले आहे. यावेळी धनश्री कांबळे यांनी सांगितले हे देवाचे आहे असे सांगितले गेल्याने मी भितीपोटी ते काढण्याचे धाडस केले नाही मात्र अंधश्रध्दा समितीच्या नंदीनी जाधव यांनी मला समजुन जागून माझ्या मनातील भिती व अंधश्रध्दा कशी आहे हे पटवून सांगितले, आणि माझ्या कुटूंबांनी ही त्याला परवानगी दिली. तर याबाबत नंदीनी जाधव म्हणाल्या की देवाचा आणि जटेचा काही संबंध नाही. अस्वच्छतेमुळे, केस व्यवस्थित विंचरले नाही तर केसांचा गुंता तयार होतो. त्यालाच जट म्हणतात.ती कापली तर काहीतरी वाईट घडेल असे त्याच्या मनात भीती असते. महिल्यांमध्ये या जटाबाबत मोठी अंधश्रध्दा आहे. देवरूषी, बुवा, महाराज यांच्या सांगण्यावरून महिला वर्षानुवर्ष डोक्यात ही जट तशीच ठेवतात यामुळे महिलांना खुप डोके, मानेला त्रास होतो. शरीरावर मोठा परिणाम होत असतो. यामुळे या जटेला वेळेत कापणे गरजे आहे.

5 COMMENTS

  1. A formidable share, I just given this onto a colleague who was doing a bit of evaluation on this. And he the truth is bought me breakfast as a result of I found it for him.. smile. So let me reword that: Thnx for the treat! But yeah Thnkx for spending the time to debate this, I feel strongly about it and love reading extra on this topic. If potential, as you change into experience, would you mind updating your blog with extra details? It’s extremely useful for me. Massive thumb up for this blog post!

  2. Hey there! This post could not be written any better! Reading through this post reminds me of my good old room mate! He always kept chatting about this. I will forward this post to him. Fairly certain he will have a good read. Many thanks for sharing!

  3. Hey There. I discovered your weblog using msn. That is a very neatly written article. I will be sure to bookmark it and come back to learn more of your helpful info. Thank you for the post. I’ll definitely return.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here