शेवगाव पोलीस ठाण्यासमोरच प्राध्यापक मुंढे यांचे आमरण उपोषण

राष्ट्र सह्याद्री : प्रतिनिधी
शेवगाव : पोलीस ठाण्यासमोरच प्रा.महादेव बाळासाहेब मुंढे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. प्राध्यापक महादेव मुंडे हे आबासाहेब काकडे कॉलेज ऑफ बी फार्मसी महाविद्यालय बोधेगाव येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत होते. परंतु अचानक त्यांना जीवे मारण्याची धमकी कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आला तर जीवे मारू असे त्यांना कॉलेज प्रशासनाकडून धमकावण्यात आले, असा आरोप महादेव मुंडे यांनी केला आहे, त्याचबरोबर माझ्या मासिक वेतनातून दहा पाचशे रुपये संस्था चालक यांना मी देण्यास नकार दिल्यामुळे मला प्रशासनाकडून धमकी देण्यात येत असल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली,

        निवेदनात प्राध्यापक मुंडे यांनी पुढे असे म्हटले आहे की, सहाव्या वेतन मानानुसार शासन जी आर नुसार माझ्या पगारातील रक्कम माझ्या खात्यावर निर्गमित करण्याचे आदेश द्यावे, कॉलेजमध्ये येण्याची बंदी उठवावी व बेकायदेशीर गोष्टींची चौकशी करावी, संपतराव दसपुते यांनी मला धमकावून खंडणी स्वरूपात घेतलेल्या दहा पाचशे रुपये रकमेची उच्चस्तरीय चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, मला जिवे मारण्याची धमकी देणारे महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश मोकाटे, उप प्राचार्य भारत जाधव, संदीप बडधे,शिपाई दत्तू वंजारी यांची चौकशी करावी,संस्थाचालक शिवाजीराव काकडे यांनी जाणीवपूर्वक दिलेली वेठबिगारी वागणूक, शारीरिक त्रास,मानसिक त्रास व आर्थिक शोषण याची चौकशी करावी महाविद्यालयात प्राचार्य डॉ.शशिकांत पट्टण यांची उत्तरस्तरीय चौकशी करणे बाबत,त्याच बरोबर संदिप दसपुते हे आबासाहेब काकडे विद्यालयांमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत तरीही ते बी फार्मसी महाविद्यालय समन्वयक म्हणून काम करतात, याचीही चौकशी करण्याची मागणी मुंढे यांनी यावेळी केली,उपोषण करत असताना माझ्या जीविताला धोका झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असेही मुंढे यांनी निवेदनात म्हटले आहे.ह्या सर्व मागण्या घेऊन मुंढे हे शेवगाव पोलीस स्टेशन समोर उपोषणास बसले आहे,
संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शेवगाव पोलीस स्टेशन समोर हे उपोषण चालू होते, प्रशासनाच्या वतीने कोणते अधिकारी उपोषणास्थळी आले हे मात्र समजू शकले नाही,आबासाहेब काकडे समूहांमध्ये या पाठीमागेही अनेक वेळा शिक्षकांवर हल्ले झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत, त्यामुळे पोलिस प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता योग्य ती कारवाई केली पाहिजे असा सूर आता जनतेमधून निघत आहे

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here