शिर्डीतील पोलीस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भावाचे मृत्यू बाबत दाखल असलेल्या अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये आपण केलेल्या खर्चापोटी आपल्या पाच हजार रुपये द्यावेत अशी मागणी करत ती रक्कम स्वीकारताना शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी प्रवीण दिलीप अंधारे (वय-३३) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिसना निरीक्षक हरीश खेडकर यांनी रंगेहात पकडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तालुक्यातील जवळके येथील.एका इसमाच्या भावाचे निधन काही दिवसापूर्वी काही कारणावरून नुकतेच झाले आहे.

या प्रकरणात पंचनामा करणे त्याचा अहवाल (चार्जशीट) न्यायालयात दाखल करणे आदी कामे पोलिसांना करावी लागतात मात्र यात सामान्य माणूस बऱ्याच वेळा अज्ञानामुळे भरडला जाऊन त्याच्याकडून लोकसेवक लाचेची मागणी करून त्याना ती देण्यासाठी मजबूर करतात.असाच काहीसा प्रकार जवळके या ठिकाणी घडला असून या ठिकाणी संतप्त झालेल्या मयताच्या भावाने (वय-२९) लाच मागणाऱ्या तपासी पोलीस कर्मचाऱ्याच्या विरुद्ध थेट नगर येथील लाचलुचपत विभागाशी दि.०९ ऑक्टोबर रोजी संपर्क साधून यातून वाचविण्याचा मार्ग विचारला असताना या विभागाने त्यास मदत करून त्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध सापळा लावून रुपये पाच हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी प्रवीण अंधारे यास पंचासमक्ष नुकतेच जेरबंद केले आहे.त्या बाबतीत रोख रक्कम जप्त केली आहे.त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

या बाबत नाशिक विभागाचे पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हरीश खेडकर,दीपक करांडे,आदींनी सहकार्य केले आहे.दरम्यान या घटनेने शिर्डी व परिसरात खळबळ उडाली आहे.या घटनेने लाच घेणाऱ्या लोकसेवकांना चाप बसण्यास मदत होणार आहे.लाच लुचपत विभागाच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here