कौठा येथे पावसात वीज पडून 500 गोण्या कांदा जळून खाक :, शेतकर्‍यांचे लाखोंचे नुकसान

श्रीगोंदा : प्रतिनिधी : श्रीगोंदा तालुक्यातील कौठा या ठिकाणी काल मध्यरात्री झालेल्या पावसात कांदा वाखारीवर वीज कोसळून सुमारे 500 गोणी कांदा जळून खाक झाल्या आहे.

त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होतांना दिसत आहे
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी अनेक आस्मानी संकटांना तोंड देत असताना पुन्हा एकदा तालुक्यातील शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही, त्यात तालुक्यातील कौठा येथील बाबासाहेब सुर्यवंशी यांनी आपल्या कांद्याला बाजारभाव मिळावा यासाठी येथील शेतकऱ्याने हजारो रुपये खर्चून लाखो रुपयांचा कांदा त्यामध्ये ठेवला होता, आणि आता नुकतेच कांद्याचे बाजारभाव वाढू लागले असताना काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरात पाऊस सुरू झाला:, त्यामध्ये कांद्याच्या वखारीवर वीज कोसळून सुमारे 500 गोण्या ठेवलेल्या कांद्याच्या गोण्या जळून खाक झाल्या आहेत, त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले असून, पंचनामा करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होताना दिसत आहे

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here