श्रीगोंद्यात पोलिसांना सापडले गांजाचे शेत:, एका आरोपीला अटक

श्रीगोंदा प्रतिनिधी :- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडे या ठिकाणी धोंडिबा गणपत सोनवणे यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात गांजा लावला असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या गुप्त माहितीदाराकडून मिळताच पोलिसांनी अचानक छापा टाकून तब्बल ‘साडे सात किलो गांजा जप्त’ केला आहे. तसेच याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथील आरोपी धोंडिबा गणपत सोनवणे यांनी आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात गांजा लावला असल्याची माहिती गुप्त बातमीदारांकडून विभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांना मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले, त्या पथकाने सायंकाळी चार वाजताच्या सुमारास टाकळीकडे या ठिकाणी धोंडिबा गणपत सोनवणे यांच्या (गट नं 7 ब) मध्ये छापा मारला असता:, त्यांना त्यांच्या शेतात तब्बल 30 गांज्याची झाडे मिळून आली, त्या झाडाचे वजन सुमारे साडेसात किलो आहे. त्यांची किंमत एकूण 37500 रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यावरून धोंडिबा गणपत सोनवणे यास पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचेवर अंमली पदार्थ तस्करीच्या कायद्यांनुसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकात विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,तहसीलदार प्रताप पवार,कृषी अधिकारी म्हस्के,सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप,पोलीस हेड कॉन्स्टेबल मांडगे,सुपेकर,बेल्हेकर,जंगम, जाधव,तसेच मंडळ अधिकारी विलास अजबे तलाठी विजय मिसाळ यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here