धामोरी येथून दुचाकी चोरी :, गुन्हा दाखल

कोपरगाव : प्रतिनिधी : तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीतून अज्ञात चोरट्याने आपल्या घरासमोर उभी केलेली सुमारे ३५ हजार रुपये किंमतीची बजाज प्लॅटिना दुचाकी (क्रमांक-एम.एच.१७ सी.जे.५५६४) चोरून नेली असल्याची फिर्याद पंढरीनाथ सुखदेव पवार (वय-४५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात कोपरगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी पंढरीनाथ पवार यांनी नेहमी प्रमाणे आपली वरील बजाज कंपनीची प्लॅटिना हि दुचाकी आपल्या घरासमोर कुलूप लावून उभी केलेली असताना (दि.५) ऑक्टोबर रोजी रात्री अज्ञात चोरट्याने तिचे कुलूप तोडून गाडी फरार केली.ही बाब त्यांच्या सकाळी झोपेतून उठल्यावर लक्षात आली.याबाबत त्यांनी कोपरगाव तालुका पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी याप्रकरणी दु.र.क्रं.४९९/२०२० भादवि कलम ३७९ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.प्रभाकर काशिद हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here