Flying School: ‘या’ शहरात बनणार फ्लाईंग स्कूल!

देशातील निवडक विमानतळांवर फ्लाईंग स्कुल सुरू करण्याची केंद्र सरकारची योजना

बेळगाव / प्रतिनिधी

देशातील निवडक विमानतळावर फ्लाईंग स्कूल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकार वतीने करण्यात आली आहे. यामध्ये बेळगावच्या सांबरा विमानतळाची निवड करण्यात आली आहे.

याबरोबरच कर्नाटकातील गुलबर्गा सह देशातील अन्य सहा विमानतळांची या फ्लाइंग स्कूल साठी निवड झाली आहे. सध्या देशांतर्गत विमानसेवा वाढली आहे यामुळे भविष्यात पायलट ची गरज वाढणार आहे याची पूर्तता या शाळेद्वारे करण्यात येणार आहे.

सम्राट विमानतळाची निवड झाल्याने या भागातील युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, तर या विमानतळाचा दर्जा वाढण्याबरोबरच महत्त्वही वाढणार आहे‌ सांबरा विमानतळाची फ्लाईंग स्कूल साठी निवड झाल्यानंतर या विमानतळावर विकास कामे सुरू करण्यात आली आहेत.2018 मध्ये तत्कालीन केंद्रीय नागरी विमानयान मंत्री जयंत सिन्हा बेळगाव भेटीवर आले असता सांबरा विमानतळावर फ्लाइंग स्कूल सुरू करण्याबाबत मत व्यक्त केले होते. या आश्वासनाची आता लवकरच पूर्तता होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here