Exam: यंदा दहावी _ बारावीची परीक्षा लांबणीवर..!

गिरीश कल्लेद । राष्ट्र सह्याद्री

बेळगाव :

कोरोना संकटामुळे राज्यात अद्यापही शाळा _ महाविद्यालये सुरू करण्यात आली नाहीत तर कधी सुरू होतील याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे. यंदाच्या दहावी आणि बारावी परीक्षा ही दरवर्षी प्रमाणे वेळेत होण्याबाबत ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदाच्या अभ्यासक्रमातही 30 ते 40 टक्के कपात करण्यात आली आहे तर विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी दहावी आणि बारावीची परीक्षा ही मार्च _एप्रिल या महिन्यात न होता मे किंवा जून महिन्यात होण्याची शक्यता परीक्षा मंडळ यांनी व्यक्त केली आहे.


अद्यापही शाळा महाविद्यालये सुरू झाली नसल्याने परीक्षाही लांबणीवर पडणार आहेत. दरवर्षी राज्यात मार्च अखेरपर्यंत बारावीच्या तर मार्च आणि एप्रिल या महिन्यात दहावीच्या परीक्षा घेतल्या जातात तर मे अखेरच्या आठवड्यात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनामुळे अद्यापही शाळा महाविद्यालये सुरू झाली नसल्याने परीक्षेवर ह्याचा परिणाम होण्याची शक्यता माध्यमिक तसेच पदवी पूर्व शिक्षण परीक्षा मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here