Superstition: फसवणूक करणाऱ्या मांत्रिकास अटक:, सहा कोटीची मालमत्ता जप्त

बेळगाव : प्रतिनिधी

साहित्यिक के कल्याण कुटुंबियांची फसवणूक केलेल्या मांत्रिकास पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळून एकूण 6 कोटीची मालमत्ता जप्त करण्यात आली.
शिवानंद वाली असे या मांत्रिकाचे नाव आहे. त्याने साहित्यिक के कल्याण कुटुंबियांची लाखो रुपयांची मालमत्ता आपल्या नावावर करून घेतली होती. अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ.विक्रम आमटे यांनी दिली.

सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पोलिस उपायुक्त डॉ.आमटे यांनी मांत्रिक शिवानंद वाली यांने प्राथमिक चौकशीत साहित्यिक के. कल्याण यांची फसवणूक केल्याचे मान्य केल्याचे सांगितले. या मांत्रिकाविरोधात माळ मारुती पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

मांत्रिकाकडून 9 मॅक्सी कॅब, 6 किलो चांदी,350 ग्रॅम सोने, या सह बेळगाव, हुबळी,धारवाड आणि बेंगलोर आदी ठिकाणी जमिनी व अन्य जागा अशी एकूण सहा कोटीची मालमत्ता असून, ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी गंगा कुलकर्णी हिचा शोध घेण्यात येत आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी यावेळी दिली.

साहित्यिक के. कल्याण यांच्या घरात घरकाम करणाऱ्या गंगा कुलकर्णी हिच्याद्वारे कल्याण यांच्या पत्नी ला तुमच्या नावावर मालमत्ता असल्यास पतीच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले, आणि सर्व मालमत्ता आपल्या नावावर करण्याचे सांगितले होते. आपल्या अंगात देव येत असल्याचे सांगून या मांत्रिकाने के.कल्याण आणि त्यांच्या पत्नीमध्ये दुरावा निर्माण केला होता.सदर मांत्रिकाने काळी जादू केली आहे का ? या दिशेनेही पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान या मांत्रिका विरुद्ध कर्नाटक अमानवी दूष्ट पद्धती आणि प्रतिबंधक आणि निर्मूलन 2017 कायद्यांतर्गत प्रकरण दाखल दाखल करण्यात आले आहे. अशी माहितीही पोलीस उपायुक्त डॉ.विक्रम आमटे यांनी यावेळी दिली. सदर प्रकरण पोलिसांसमोर एक आव्हान होते, मात्र माळमारुती पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी.आर.गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली सदाशिव कट्टीमनी व सहकाऱ्यांनी काही दिवसातच या प्रकरणाचा शोध लावला आहे. याबाबत शहर पोलीस आयुक्तांनी या पोलिसाचे अभिनंदन केले आहे.

सदर प्रकरणातील आणखी एक आरोपी गंगा कुलकर्णी हिचा पोलिस शोध घेत असल्याचे पोलिस उपायुक्त डॉ.विक्रम आमटे यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here