TRP Scam: ‘या’ कंपन्यांनी केल्या टीव्हीवरील जाहिराती स्थगित; माध्यमांच्या कार्यपद्धतीवर केली नाराजी व्यक्त

Rashtra Sahyadri Updates…
मुंबई:
टीआरपी घोटाळा समोर आल्यानंतर माध्यमावर टीका होत आहे. टी आरपी घोटाळ्यांतर जाहिरातदार आणि मीडिया एजन्सींकडू जाहिरातींचे कॉन्ट्रॅक्ट स्थगित केले जात आहेत. यातच पारले या बिस्कीट कंपनीने टीव्हीवरुन जाहिरात करणार नसल्याचे सांगितले आहे. असे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने घोषित केले आहे.
काही दिवसांपूर्वी तीन चॅनेल्सचे नाव टीआरपी स्कॅममध्ये पुढे आले आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या टीव्ही न्यूज चॅनेल्सवर कंपनीकडून जाहिरात करण्यात येणार नाही. आमच्या या निर्णयाचे स्वागत करुन इतरही कंपन्यांनी हाच मापदंड ठरवावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे, टीव्ही न्यूज चॅनेल्संना यातून स्पष्ट संदेश देण्यात येईल की, आपल्या कंटेंटमध्ये बदल गरजेचा आहे. पारले कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी सांगितले.

यापूर्वी बजाज कंपनीनेही असाच निर्णय जाहीर केला आहे. बजाज या तीन चॅनेलवर जाहिराती देणे बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे असे कंपनीचे संचालक राजीव बजाज यांनी सांगितले. आक्रमकता आणि सामाजिक स्वास्थ बिघडविणाऱ्या चॅनेल्सवर पैसा खर्च करण्याची कंपनीची थोडीही इच्छा नाही. पारले कंपनीच्या या निर्णयाची सोशल मीडियावर प्रशंसा करण्यात येत असून पारलेचं कौतुक होत आहे. हे. त्यामुळे, पारले कंपनीने बजाज कंपनीचे अनुकरण केल्याचे दिसून येते. तर, पारले व बजाज प्रमाणेच देशातील इतरही कंपन्यानी असा निर्णय घ्यायला पाहिजे, असेही नेटीझन्सनी सूचवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here