राज्य सरकारच्या विरोधात हायकोर्टात केस दाखल करणार

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा इशारा.
राजेंद्र झेंडे, राष्ट्र सह्यार्दी पाटस, ः केंद्र सरकारने मंजुर केलेले कायदे राज्य सरकारला अडवता येत नाही किंवा त्याला स्थगिती देण्याचा अधिकारी संविधानात नाही, मात्र केवळ राजकरणासाठी आणि भाजप विरोधी वातावरण करण्यासाठी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या शेतकरी कायद्यास महाआघाडीचे सरकार विरोध करीत आहे. राज्यसरकारच्या या भुमिकेच्या विरोधात आम्ही हायकोर्टात केस दाखल करणार आहे. अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.
    दौंड तालुका भाजप किसान मोर्चाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांचे स्वागत करण्यासाठी बळीराजा सन्मान आणि ट्रॅक्टर रॅलीचे सोमवारी ( दि.12 ) आयोजन भाजप किसान मोर्चाच्या वतीने करण्यात आले होते.यावेळी पुणे सोलापूर महामार्गावरील सेवा रस्त्यावरून वरवंड ते चौफुला अशी टॅक्टर रॅली काढण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या सभेत भाजपचे राज्यप्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते. शेतकरांना मार्गदर्शन करताना पाटील पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. मात्र राज्य सरकार या कायद्याला का विरोध करीत आहे. कॅाग्रेस ने स्वार्थासाठी या कायद्याला विरोध करीत आहेत. कॅाग्रेसच्या जाहीर नाम्यातीव मागण्या या कायद्यात आहेत. हिंदुत्व म्हणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ही या कायद्याला विरोध करीत आहेत हे दुर्दवी. एक आमदारच्या पत्रावरून  केंद्राने मंजुर केलेल्या कायद्याला हे सरकार स्थगीत देत आहे. मुळात केंद्राच्या कायद्याला स्थगित देता येत नाही हे या सरकराला माहिती नाही का, यांना मराठा समाजाला दिलेले आरक्षण ही टिकवता आले नाही.असा टोला त्यांनी लगावला.
       यावेळ माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष डॅा.अनिल बोंडे,माजी मंत्री आमदार बाळा भेंगडे, किसान मोर्चाचे सरचिटणीस वासुदेव काळे, भाजप पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान , वरवंड ते चौफुला अशी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीचे पुजन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते केल. या टॅक्टर रॅलीत टॅक्टर मध्ये चंद्रकांत पाटील यांच्यासह माजी पणनमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहुल, वासुदेव काळे आदींनी सहभाग घेतला. या रॅलीचे प्रमुख आकर्षन बनले होते ते   ट्रॅक्टर रॅलीमध्ये ‘मोदी है तो मुमकीन है’, ‘कृषी विधेयक एक वरदान’ अशा स्वरूपाचे लावण्यात आलेले फलक. या कार्यक्रमास आमदार सुजितसिंह ठाकूर, मकरंद कोरडे, सुधीर दिवे, आनंदराव राऊत, धर्मेंद्र खांडरे, माऊली ताकवणे आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here