Heavy Rain : ‘या’ सात जिल्ह्यात रेड अलर्ट..!

गिरीश कल्लेद । राष्ट्र सह्याद्री

बेळगाव:
पुढील 48 तासात उत्तर कर्नाटकातील सात जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. विजापूर चे जिल्हाधिकारी पी. सुनील कुमार यांनी ही माहिती दिली आहे‌. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे उत्तर कर्नाटकातील बेळगाव सह राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आले आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी पी. सुनिलकुमार यांनी दिली आहे.
बेळगाव सह विजापूर, बागलकोट, रायचूर, बिदर, यादगिरी आणि गुलबर्गा जिल्ह्यात पुढील 48 तासात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट घोषित करण्यात आले आहे, तर मंगळवारी दुपारपासूनच बेळगाव शहरासह जिल्ह्यातील परिसरात बऱ्याच ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here