Politics: थोरातांवरील आरोप हस्यास्पद…, ‘त्यांनी’ आपल्या बुडाखाली काय शिजतय? ते तपासावे: मुरकुटे

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री


श्रीरामपुर: गेल्या १० वर्षात विरोधकांनी तालुक्यात नंगानाच घालुन तालुका भकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यांनी अनेक घोटाळे केले तेच आता सत्ता गेल्याने कासाविस झाल्यामुळे जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष इंद्रनाथ पा. थोरात यांच्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत, ही हस्यास्पद बाब असल्याची टीका जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

मुरकुटे यांनी म्हटले आहे कि, इंद्रनाथ थोरात यांनी गेली ४० वर्षे तालुक्यात राजकारण करीत असताना तालुक्याला विकासाची दिशा दिलेली आहे. राजकारणात मिळालेल्या पदांचा वापर त्यांनी जनतेच्या हितासाठीच केलेला आहे.स्व. आबासाहेब निंबाळकर, स्व. भाऊसाहेब थोरात, स्व बाळासाहेब विखे पाटील, स्व.मारुतराव घुले , स्व. शंकरराव काळे, स्व. गोविंदराव आदिक, स्व. जयंतराव ससाने, मा.खा.यशवंतराव गडाख, मा.आ.भानुदास मुरकुटे आदी सहकारातील व जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांच्या सोबतीने त्यांनी तालुक्यात काम केलेले आहे. तालुक्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा आहे. गेली १० वर्षे ते देखरेख संघाचे अध्यक्ष आसल्याने संघाची मालमत्ता आज तगायत शाबुत राहीली आहे. त्यांच्या दुरदृष्टीने सतत विकासाला चालना मिळालेली असताना सत्तेतुन पायउतार झालेले विरोधक बगलबच्या करवी थोरातांवर हस्यास्पद आरोप करुन थोरातांनी देखरेख संघाची मालमत्ता हडप केल्याचा खोटा व बिनबुडाचा आरोप करीत आहेत.
वास्तवीक आरोप करणाऱ्या विरोधकांनी गेल्या १० वर्षात काय दिवे लावले हे संपुर्ण तालुक्याला माहीत आहे. गेल्या १० वर्षात जनतेने दिलेल्या सत्तेच्या माध्यमातुन विरोधकांनी नंगानाच घालुन मलई खाल्ली आहे. अनेकांच्या जमिनी, इमारती, जागा बळकावुन पैसा कमावला आहे. विरोधकांना फक्त पैसा कमावण्यासाठी सत्ता हवी आहे. माञ आता तालुक्यातील सर्वच सत्तेतुन ते पायउतार झाल्याने व त्यांचे पैसा कमावण्याचे धंदे बंद झाल्याने त्यांची मानसिकता विकलांग झाल्याने ते केवळ खोटेनाटे आरोप करीत आहेत. जनतेने त्यांना विधानसभेला लाथाडल्याने आरोप करुन ते स्वःताचे अपयश झाकण्याचे काम करीत आहेत. थोरातांनी गेली १० वर्षे देखरेख संघाची मालमत्ता सांभाळली नसती तर विरोधकांनी या मालमत्ते वरही डल्ला मारला आसता हे वास्तव आहे.
निवेदनात पुढे नमुद करण्यात आले आहे कि, मानसिक विकलांग झालेल्या विरोधकांनी कितीही खटाटोप केला तरी त्यांनी आजपर्यंत केलेल्या पापावर ते पांघरुन घालु शकत नाही. आगामी काळात सुज्ञ मतदार त्यांना माफ करणार नसल्याने त्यांनी बिनबुडाचे हास्यास्पद आरोप थांबवावेत.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here