गळनिंब परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच :, शेळीचा फडशा

उक्कलगाव / गळनिंब : प्रतिनिधी : तालुक्यातील गळनिंबमध्ये बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत झाले आहेत. गावापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणार्‍या दत्तात्रय बाळाजी जाटे यांच्या वस्तीवर मंगळवारी रात्री 1 ते 3 वाजताच्या सुमारास शेळीवर हल्ला करून बिबट्याने भक्ष बनवले आहे.
या हल्ल्यामुळे मागील काही दिवसापासून थंडावलेली बिबट्याची दहशत पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे या परिसरातील नागरिक, शेतकरी, महिला घाबरून गेल्या आहे. कारण मागील सहा महिन्यापूर्वीच कु.ज्ञानेश्वरी मारकड या बालिकेवर हल्ला करून तिचा बळी घेतला होता. या भागातील अनेक शेळ्या, वासरे, कुत्रे, हे बिबट्या नेहमीच फस्त करत आहे. परंतु कालचा बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये शेळी चा फडशा पडलेल्यामुळे गळनिंबला बिबट्याचा पुन्हा एकदा बिबटयाचा धुमाकूळ सुरुच झाल्याने शेतकर्‍यामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले चित्र पहावयास मिळत आहे. वारंवार बिबट्याच्या हल्ल्या च्या घटना घडत असताना वनअधिकाऱ्यांनी या घटने कडे दुर्लक्ष केले जात आहे

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here