ट्रकच्या चाकाखाली सापडून तरुण ठार

राहूरी फॅक्टरी : प्रतिनिधी
नगर मनमाड राज्य महामार्गाची दुरावस्था झाल्याने दररोज ‘एक ना ‘दोन’ अपघात घडत आहे.राहुरी तालुक्यातील गणेगाव येथील रमेश कारभारी कोबरणे (वय ३८)या तरुणाचा देहरे तालुका नगर येथे ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 7: 30 वाजताच्या सुमारास घडली.

नगर मनमाड राज्यमार्गावरील खड्ड्यामुळे तरुणाचा बळी गेल्याने तरुण वर्गातुन संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रमेश कारभारी कोबरणे हा तरूण गुरवारी सकाळी नगर येथील औद्योगिक वसाहतीत कामाला जाण्यासाठी गणेगाव येथुन दुचाकी क्र.एम.एच 14 ऐ.एन 9929 वरुन जात असताना देहरे (ता.नगर ) येथे नगर मनमाड राज्यमार्गावरील खड्डे चुकविताना ट्रकचा दुचाकीला धक्का लागला. त्यात रमेश कोबरणे रस्त्यावर पडला, आणि ट्रकच्या चाकाखाली सापल्याने जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती गणेगाव येथे समजताच गावावर शोककळा पसरली.
अपघाताची माहिती मिळताच भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांच्यासह कार्यकर्ते, मित्र,नातेवाईक यांनी देहरे येथे धाव घेतली. औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यातील पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. मयत रमेशच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

43 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here