Police: पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार प्रकरणास कलाटणी

Rashtra Sahyadri Updates…

बेळगाव / प्रतिनिधी

हुक्केरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी यांच्याकडून हल्ल्याचा तसेच मानभंगाचा प्रयत्न झाल्याची तक्रार येथील कुरणकर कुटुंबाने केली आहे. मात्र या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी यांनीही विरोधात खुनाचा प्रयत्न, हल्ला करणे आणि मानभंगाचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल केली आहे.

बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी आणि कुरणकर कुटुंबीयांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे. बेळगाव येथील कुरणकर कुटुंबीय दि.13 रोजी कुटुंबातील सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त खानापूर तालुक्यातील एका खासगी रिसॉर्ट मध्ये गेले होते, तेथून परतताना रात्री साडे अकराच्या सुमारास मार्गावरील विश्वेश्वरय्या विद्यापीठानजीक पोलीस निरीक्षक कल्याणशेट्टी यांचा मेव्हणा व कुटुंबीयांच्या कारला त्यांच्या कारची पाठीमागून धडक बसली. यावरून कुरणकर कुटुंबीय आणि कल्याणशेट्टी यांच्या मेहुणा आणि कुटुंबीयांमध्ये जोरदार वादावादी झाली. प्रकरण हातघाईवर आले कुरणकर कुटुंबातील सदस्य तसेच दोन कारमधील पंधरा जणांनी आपला मेव्हण्या चा खून करण्याचा प्रयत्न केला, तसेच त्याच्या पत्नीवर अतिप्रसंग करण्याबरोबरच सासू तसेच कारवर हल्ला करुन नुकसान केले आहे. अशी तक्रार पोलीस निरीक्षक कल्याण शेट्टी यांनी केली आहे.

तर कुरणकर कुटुंबीयांनी पोलीस निरीक्षक कल्याणशेट्टी यांनीच आपल्यावर हल्ला करून पत्नीवर अतिप्रसंग केल्याची तक्रार केली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात परस्पर विरोधी तक्रार नोंद करून घेण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुनील कुरणकर, रुपेश पाटील यांच्यासह अन्य पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल केले आहे. तसेच आयपीसी कलम 143, 147, 148, 149, 323, 324, 35 4 बी , 427, 504, 506 आणि 279 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाची बेळगाव परिसरात गुरुवारी जोरदार चर्चा सुरू होती.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here