Cyclone: ‘या’ भागाला आणखी 15 तास चक्रीवादळ, अतिवृष्टीचा धोका!

नगर: आज (दि 15 ऑक्टोबर) सकाळी 9 पासून ते उद्या (दि. 16) पहाटे 3 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 15 तास चक्रीय वादळाचा केंद्र बिंदु वडुज, कोरेगाव, सातारा, पाटण, कराड या परीघात राहाणार आहे. त्यामुळे हा परिसर व या केंद्रापासून जवळपास 130 ते 160 किमि अंतरावरील चोहीबाजूकडील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वेगवान वारे अतिवृष्टी, महापुराला /नुकसानीला सामोरे जावे लागेल असे चित्र दिसत आहे.
यानंतर हे चक्रीय वादळ कोयना पाणलोट क्षेत्रातून प्रतापगड चिपळून मार्गे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गुहागर परिसरातून दि. 16. ला सकाळी अरबी समुद्रात प्रवेश करेल.
जवळपास 15 तास वर उल्लेख केलेला भाग चक्रीय वादळाच्या केंद्र स्थानी राहाणार असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असे चित्र आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here