शिकारीच्या शोधात ‘ बिबटया ‘ अचानक अंगणात आल्याने नागरिकांची धावपळ

राष्ट्र सह्याद्री, प्रतिनिधी

राहाता : तालुक्यातील हनुमंतगावच्या भालेराववाडी येथे काल संध्याकाळी ७.३० वाजता च्या रामभाऊ व भागवत कानडे यांच्या वस्तीवर बिबट्याने संरक्षक जाळीच्या गेट च्या खालून आतमध्ये प्रवेश केला.

घरातील माणसे घरासमोर ओट्यावर बसलेली होती. बिबट्याला बघून सर्वाची चांगलीच भंबेरी उडाली मदतीसाठी ओरडाओरडा सुरु झाल्याच्या नादांतच बिबट्याने घरासमोर असलेल्या कुत्र्यावर झडप घालून नरडीचा घोट घेतला. यावेळी शेजारीच गायाचा मुक्त गोठा असून बिबट्याचा वास आल्याने गायीनी उड्या मारण्यास सुरवात केली. या गोंधळामुळे बिबट्याला बाहेर पडण्यासाठी रस्ता सापडेना, घराकडे धाव घेतल्याने सर्वजण घाबरले, शेजारील मदतीसाठी आलेले कंपाऊड बाहेर थांबले. काहींनी फटाके फोडले. एवढ्या गोंधळात बिबट्याने चाऱ्याच्या गंजीवरून उडी मारत

शेताकडे पळ काढला
गोंधळामुळे बिबटया पळाला की लपला अशी शंका निर्माण झाल्याने युवकांनी काठ्यांच्या साह्याने बॅटरीच्या प्रकाशात सर्व घराजवळील भाग पिंजून काढला, पण बिबट्या आढळून आला नाही. सर्व कुटूंबीय रात्रभर जागे होते.
या भागात काही दिवसापासून बिबट्या मादी व पिल्ले असल्याची नागरिकांचे म्हणणे आहे. शेतात हे बिबटे बऱ्याच जणांना आढळले दिसत आहे. या ठिकाणी वनखात्याने त्वरित पिंजरा लावण्याची नागरीकांनी मागणी केली आहे.

7 COMMENTS

  1. I’ve recently started a web site, the information you provide on this web site has helped me greatly. Thank you for all of your time & work. “If you see a snake, just kill it. Don’t appoint a committee on snakes.” by H. Ross Perot.

  2. I would like to thnkx for the efforts you’ve put in writing this web site. I am hoping the same high-grade website post from you in the upcoming also. Actually your creative writing abilities has encouraged me to get my own website now. Really the blogging is spreading its wings fast. Your write up is a good example of it.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here