डाॅ.मुरकुटे यांनी घेतली टाकळीभान प्रा.आ.केंद्रातील अधिकार्‍यांची झाडाझडती

टाकळीभान (प्रतिनिधी) : श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नुकतीच आढावा बैठक पार पडली.
या बैठकीत कामासंदर्भात पं.स.सदस्या डाॅ. वंदना मुरकुटे यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
प्रा.आ.केंद्राच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या आढावा बैठकीत कामासंदर्भात योग्य सुचना डाॅ.मुरकुटे यांनी करून कामात दिरंगाई अथवा कसूर करण्यात आल्यास कारवाई केली जाईल. अशा सूचना यावेळी केल्या.

सध्याच्या काळामध्ये लोकांना आपली खरी गरज असून, आपण त्यांना नियमित सेवा पुरवावी.

आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांनी गाव आपले कुटूंब असून आपण त्यांचे सेवक आहोत, हे विसरून चालणार नाही. त्याच बरोबर जनतेला आपल्याकडून चांगल्या कामांची व सेवेची अपेक्षा आहे. आपण चांगली सेवा देवून आरोग्य केंद्रात चांगले काम करावे, व गावाचा लौकीक वाढवावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या बैठकीस जि.प.सदस्या संगीता गांगूर्डे, प्रा.कार्लस साठे, ग्रामविकास अधिकारी आर.एफ.जाधव, स्थानिक आरोग्य समितीचे आबा रणनवरे, वर्षा गाढे, अर्जून राऊत, पंचायत समिती वैद्यकीय अधिकारी डाॅ.मोहन शिंदे, टाकळीभान आरोग्य केंद्राचे डाॅ.बापूसाहेब चाबूकस्वार, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here