E-Commerce: पेटीएम युजर्सना आता नवा भुर्दंड!

नवी दिल्ली – पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाची संकल्पना लोकांसमोर मांडली ती अनेकांनी अंमलातही आणली. वीज बील भरणा, गॅस सिलेंडर बूक करणे, मोबाईल-डीटीएच रिचार्ज करण्यापासून ते ऑनलाईन खरेदीपर्यंत ऑनलाइन सर्विसचा लाभ घेतला. यामध्ये पेटीएम, गुगल पे, अशा कितीतरी कंपन्या बाजारात आल्या. सुरुवातील या कंपन्यांनी कोणताही अतिरिक्त कर लादला नाही पण आता पेटीएम व्हॉलेटचा वापर करणे आज पासून महागले आहे.

पेटीएम मध्ये पैसे लोड करण्यासाठी पडेल चार्ज
कंपनीने नुकत्याच केलेल्या बदलामुळे पेटीएम वॉलेट मध्ये क्रेडिट कार्डने पैसे टाकण्यासाठी अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार आहे. हा नियम 15 ऑक्टोबर पासून लागू करण्यात आला. पैसे ऍड करणाऱ्या व्यक्तीला दोन टक्के अतिरिक्त चार्ज मोजावा लागणार आहे. यातच जीएसटीचा ही समावेश कंपनीने केला आहे

सोपे करून सांगायचे झाले तर पेटीएम मध्ये जर 100 रुपये टाकायचे असल्यास आपल्याला क्रेडिट कार्ड मधून 102 रुपयांचे पेमेंट करावे लागेल त्यामुळे नेहमी पेटीएम युज करणाऱ्या ग्राहकांना तोटा सहन करावा लागणार आहे.

Vipswallet
Click on image & download 100% indian Vipswallet, 100% free… no hidden charges…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here