Love Shrirampur: ‘लव्ह श्रीरामपूर’च्या निमित्ताने ससाणेंचा आदिकांना टोला…

श्रीरामपूर पालिकेत राजकीय वाद भडकणार..!

श्रीरामपूर : शहरातील प्रवरा कालव्याच्या कडेला काल नगरचे आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते ‘लव्ह श्रीरामपूर’ या प्रतिकृतीचे उदघाटन झाले. नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या या संकल्पनेला खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, सत्यजित तांबे, वैशाली सामंत, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अविनाश आदिक आदींनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

मात्र उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी यामिनित्ताने पालिकेच्या गैरकारभारविरुद्ध आवाज उठविला आहे.

“धन्यवाद नगराध्यक्षा मॅडम बरं झालं चोथानी हॉस्पिटल समोरील जॉगिंग ट्रॅकवरील तुटलेले व्यायाम साहित्य, बंद असलेल्या लाईट, कचऱ्याबरोबर पडलेल्या दारुच्या बाटल्या ही सत्य परिस्थिती काल आलेल्या पाहुण्यांन पासून लपवून ठेवल्या नाहीतर आपले श्रीरामपूर वरील खरं प्रेम दिसून आलं असतं”

-करण ससाणे, उपनगराध्यक्ष
कॅनॉल कडेला झालेल्या या दुरावस्थेकडे करण ससाणे यांनी लक्ष वेधले आहे

स्व. जयंत ससाणे यांनी श्रीरामपूर शहराला सुंदर बनविण्यासाठी अनेक उपक्रम राबविले पण आताच्या सत्ताधाऱ्यांनी त्याचे विद्रुपीकरण केल्याचा आरोप ससाणे यांनी केला आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here