घर साफ करण्यासाठी आलेल्या महिलेने केली तिजोरी ‘साफ’

बेळगाव / प्रतिनिधी

दसरा सणा निमित्त घरात झाडलोट करण्यासाठी आलेल्या महिलेने तिजोरीतील 31 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र चोरले होते. याप्रकरणी खडेबाजार पोलिसांनी एका महिलेस अटक केली आहे.
शास्त्रीनगर, पाचवा क्रॉस येथे हा चोरीचा प्रकार घडला आहे . दि. 13 रोजी ही घटना घडली असून 14 रोजी घरच्या मंडळींना तिजोरीतील सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे समजले. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून घरात झाडलोट करण्यास आलेल्या महिलेने मंगळसूत्र चोरल्याचे स्पष्ट झाले. सुनिता वसंत मंजळकर रा. मारुती नगर असे या महिलेचे नाव आहे.
खडेबाजार पोलिस स्थानकाचे निरीक्षक धीरज शिंदे आणि सहकाऱ्यांनी महिलेला अटक केली असून तिच्या जवळून 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here