, GDP च्या 10 टक्के खर्च केला: अर्थमंत्री

कोरोनाच्या संक्रमणाशी लढण्यासाठी भारत सरकारने देशाच्या जीडीपीच्या 10 प्रोत्साहन पॅकेज दिले आहे. त्याचबरोबर कामगार क्षेत्रातही मोठ्या सुधारणा केल्या आहेत, असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी सांगितलं. जागतिक बँकेच्या विकास समितीच्या 102 व्या बैठकीत त्यांनी सहभाग घेतला. यावेळी त्या म्हणाल्या की,” कोरोनाच्या संक्रमणाने विकसनशील तसेच विकसित अर्थव्यवस्थांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. भारताच्याही अर्थव्यवस्थेला याचा फटका बसला आहे.” “भारतात अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाने देशातील गरीबीचा स्तर कमी करण्यास यश मिळाले होते परंतु या कोरोनाच्या संकटामुळे या लढाईवर परिणाम झाला आहे” असेही त्या म्हणाल्या.सीतारमण यांनी सांगितले की, भारत सरकारने देशातील कोरोनाचे संक्रमण कमी करण्यासोबतच त्याचा सामाजिक आणि आर्थिक प्रभाव कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सुरवातीला सरकारने 23 बिलियन  डॉलरचे प्रोत्साहन पॅकेज जाहीर केले. त्याद्वारे गरीबांना थेट पैशाचे हस्तांतर आणि अन्न सुरक्षेचे उपाय करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत 271 बिलियन डॉलरचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले जे भारताच्या जीडीपीच्या 10 टक्के इतके होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here