‘सबरबिया’ बांधकाम साईटचे घरफोडी करणाऱ्या अट्टल दोघा गुन्हेगारांना लोणीकंद पोलिसांनी केले गजाआड

राष्ट्र सह्याद्री : प्रतिनिधी

लोणीकंद : येथील सबरबिया बांधकाम साईटवर घरफोडी करणार्‍या दोघा अट्टल गुन्हेगारांना लोणीकंद पोलिसांनी गजाआड केले.
लोणीकंद पोलीस ठाण्यात गु र नं ९३१/२०२०भां द. वी कलम, ४६१, ४५७, ३८० प्रमाणे दि १३/१०/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्यातील फिर्यादी अतुल सोमनाथ होले वय २० वर्षे, रा लोणीकंद, ता हवेली, जि पुणे यांनी ते काम करीत असलेल्या सबरबिया इस्टेट बांधकाम साईट वरील गोडाऊनची कोणीतरी अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा व कुलूप तोडून एकूण १,२६,६2६रू किं चा माल चोरी केले. याबाबत गुन्हा दाखल केला होता. म्हणून सदर गुन्ह्याचा गुन्हे शोध पथक तपास करीत होते. दि १५/१०/२०२० रोजी गुन्हे शोध पथक लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पहाटे ३.३० वाजता चे सुमारास दोन इसम पुणे नगर रोडवर लोणीकंद माथा येथे दोन इसम आपले कब्जात काळे रंगाचे दोन बॅगा काहीतरी सामान घेऊन जात असताना दिसले. त्यांना गुन्हे शोध पथकाने हटकले असता, ते पळून जावू लागले. म्हणून गुन्हे शोध पथकास त्यांचा संशय आल्याने त्या दोघांना शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांचेकडील माला बाबत व त्यांचे अस्तित्वा बाबत चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून त्यांना पो स्टे येथे आणून विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे १) शिवा नाना जगताप वय ४० वर्षे, रा वडारवाडी, सणसवाडी, ता शिरूर, जि पुणे, २) अविनाश किरण काळे वय २० वर्षे, रा आपले घर सोसा शेजारी पत्राचे शेडमध्ये, लोणीकंद, ता हवेली, जि पुणे असे सांगितले. त्यांचे ताब्यात भरपूर प्रमाणात स्टीलचे व पितळी धातूचे पाण्याचे नळ मिळून आले. त्याबाबत त्यांना विचारणा केली असता, त्यांनी सदरचा माल हा सबरबिया इस्टेट बांधकाम साईट येथून चोरले बाबत सांगितले. तसेच आणखी कसून तपास केला असता आरोपी अविनाश काळे याचे राहते घरातून वेगवेगळ्या आकाराच्या व वजनाच्या तांब्याच्या वायर, विद्युत डी पी, लोखंडी पट्ट्या, कुलूप किंवा कडी कोयंडा तोडण्यासाठी लागणारे लोखंडी कटर, एक्स्का ब्लेड, पंची पाना असे घरफोडी चोरी करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. तसेच त्यांनी कृषी संशोधन केंद्र, लोणीकंद येथील २७,०००रू कि चे इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर च्या आर्थिंगच्या तांब्याच्या तारा देखील चोरले बाबत निष्पन्न झालेने लोणीकंद पोलीस ठाणे गु र नं. ९२९/२०२०,भां.द.वी कलम ३७९ हा गुन्हा देखील उघडकीस आला आहे.

यातील आरोपी शिवा जगताप हा रेकॉर्ड वरील आरोपी असून, त्यांचेवर यापूर्वी देखील शिक्रापूर,पौड पोलीस स्टेशन येथे चोरी, घरफोडी चोरी तसेच विद्युत डी पी चोरीचे एकूण ०९ गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींनी पोलीस कस्टडी मधे असताना दोन्ही गुन्ह्यातील एकूण १,५३,६२६ रू किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

कामगिरी पुणे पोलीस अधीक्षक ग्रामीणचे डॉ अभिनव देशमुख
अप्पर पोलीस अधीक्षक विभागचे विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, हवेली विभागाचे सर्ई भोरे, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, सुभाष गारे, श्रीमंत होनमाने, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर,संतोष कुलथे यांनी कामगिरी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here